Oppo: ओह्हो OPPO PAD AIR टॅबलेट लाँच! जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Oppo: ओह्हो OPPO PAD AIR टॅबलेट लाँच! जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
Oppo Pad Air टॅबलेट लाँच
Image Credit source: facebook

ओप्पोने आपला नवीन टॅबलेट लाँच केला आहे. हा एक बजेट टॅबलेट असून यात अनेक खास स्पेसिफिकेशन्स देण्यात आलेली आहेत. यात 7100mAh बॅटरी देण्यात आली आहे. टॅबलेटची किंमत आणि खास वैशिष्ट्यांबाबत जाणून घेणार आहोत.  

रचना भोंडवे

|

May 25, 2022 | 5:39 PM

ओप्पोने (Oppo) या वर्षाच्या सुरुवातीला आपला पहिला टॅबलेट ओप्पो पॅड लाँच केला होता. हा टॅबलेट कंपनीने प्रीमियम सेगमेंटमध्ये जोडला आहे. ज्यांना टॅब्लेटवरून (Tablet) लॅपटॉपसारखा अनुभव घ्यायचा होता अशा ग्राहकांना यात खास फोकस करण्यात आले होते. त्यामुळे हा टॅबलेट सर्व युजर्ससाठी सोयीस्कर नव्हता. विशेषत: त्याच्या किंमतीमुळे प्रत्येकजण तो विकत घेऊ शकत नव्हता. त्यामुळे कंपनीने आता एक हलका आणि स्वस्त टॅबलेट लाँच केला आहे, ज्याचे नाव ओप्पो पॅड एअर (Oppo Pad Air) आहे. कंपनीने हा टॅबलेट Reno 8 सिरीजसोबत लाँच केला आहे. हे प्रोडक्ट चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. त्याचे वजन 440 ग्रॅम आहे. हा टॅबलेट वैशिष्ट्यांच्या बाबतीत खूप पुढे आहे. वापर करण्यासाठी हा टॅबलेट अगदी हलका आहे. यामध्ये तुम्हाला स्टायलस आणि किबोर्डचा सपोर्ट मिळतो.

ओप्पो पॅड एअरची किंमत

ओप्पो पॅड एअर स्टार सिल्व्हर आणि फॉग ग्रे या दोन रंगात उपलब्ध आहे. Oppo Pad Air च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1299 युआन म्हणजे अंदाजे 15,100 रुपये आहे. तर, 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1499 युआन म्हणजे 17,400 रुपये आहे. 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला 1699 युआन सुमारे 19,800 रुपये आहे. हा टॅबलेट सध्या फक्त चिनी मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि इतर मार्केटमध्ये त्याच्या लाँचिंगबद्दल कोणतीही माहिती नाही.

काय आहे खास?

ओप्पो पॅड एअरमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो बहुतेक बजेट स्मार्टफोन्समध्ये देण्यात येतो. डिवाइसमध्ये 6GB पर्यंत रॅमचा पर्याय देण्यात आला आहे. Oppo ने या टॅबलेटमध्ये 10.36 इंचाचा एलसीडी डिसप्ले दिला आहे. त्याचे रिझोल्यूशन 2000×1200 पिक्सेल आहे. स्क्रीन 60Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला स्क्रीन टू बॉडी रेशो 83.5 टक़्के मिळेल, तर पीक ब्राइटनेस 360nits असेल. टॅबलेट Android 12 वर आधारित Color OS वर काम करतो. यात 128GB पर्यंत स्टोरेज आहे. तसेच मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. फोन चार स्पीकर्ससह असून ते डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करतात.

8MP ऑटोफोकस कॅमेरा

टॅबलेटच्या मागील बाजूस 8MP ऑटोफोकस कॅमेरा असून तो एलईडी फ्लॅशसह उपलब्ध आहे. फ्रंटमध्ये कंपनीने 5MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. यात 7100mAh बॅटरी आहे, जी 18W चार्जिंगला सपोर्ट करते. टॅबलेटमध्ये ब्लूटूथ 5.1, वाय-फाय 5, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें