Oppo Reno 8: ‘ओप्पो रेनो 8’चे आकर्षक फिचर्स; ॲल्युमिनियम फ्रेमसोबत ग्लास फ्रंट डिझाईन

2022 मध्ये ओप्पो आपली नवी सिरीज, ओप्पो रेनो 8 (Oppo Reno 8) बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. हा स्मार्टफोन लाँच होण्याआधीच त्यांच्या फिचर्सबद्दल अनेक माहिती समोर येत आहे. या फ्लॅगशिप मोबाईलमध्ये काय संभावित फिचर्स असतील, याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

Oppo Reno 8: 'ओप्पो रेनो 8'चे आकर्षक फिचर्स; ॲल्युमिनियम फ्रेमसोबत ग्लास फ्रंट डिझाईन
Oppo Reno 8Image Credit source: file photo
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 12:33 PM

ओप्पो रेनो 8 हा 2019 मध्ये लाँच करण्यात आलेला रेनो सिरीजच्या ओप्पो कॅमेरा फोकस्ड फ्लॅगशिप आणि मिड रेंज डिव्हाईस आहे. वाजवी दर आणि स्पेशल कॅमेरा फोकस्डसाठी कंपनीचे हे मोबाईल आशियातील ग्राहकांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरले होते. आता कंपनी 2022 मध्ये नव्या सिरीजचे ओप्पो रेनो 8 (oppo reno 8) हा स्मार्टफोन (smartphone) बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहे. हा फोन लाँच होण्याआधीच फोनचे जवळपास सर्वच फिचर्सची माहिती समोर येत आहे. हा फोन जास्तकरुन ‘वनप्लस 10 प्रो’शी साधर्म्य साधणारा असेल, असे सांगण्यात येत आहे. वनप्लस 9 सिरीजपर्यंत कंपनीने नेहमी एक व्हॅनिला मॉडेल आणि एक सूप-अप प्रो किंवा टी व्हेरिएंट लाँच केला आहे. परंतु वनप्लस 10 (OnePlus 10) सिरीजसोबतच कंपनीने आता एक सिंगल 10 प्रो लाँच केले आहे.

1) अशी असेल डिझाईन

रेनो 8 ची बिल्ड क्वालिटी जास्तकरुन सारखीच राहण्याचा अंदाज आहे. अॅल्युमिनियम फ्रेमसोबत ग्लास फ्रंट डिझाईन असेल. मागील कॅमेरा ‘वनप्लस 10 प्रो’ वर असलेल्या साईड ड्रोपिंग डिझाईनसारखा असू शकतो. तर, ‘वनप्लस 10 प्रो’वर असलेल्या वळवता येणार्या डिस्प्लेपेक्षा काहीसा वेगळा असण्याची शक्यता आहे. रेनो 8 मध्ये मोठे बेझल असलेला एक डिस्प्ले असेल.

2) ओप्पो रेना 8 डिसप्ले

रेनो 8 हा छोट्या एफएचडी + AMOLED पॅनलला सपार्ट करु शकतो. सोबतच स्मूथ ट्रांजॅक्शन एक्सपिरीयंससाठी 90 किंवा 120 हर्टज् रेट सोबत ग्राहकांसाठी उपलब्ध होउ शकतो.

3) तीन कॅमेरे असण्याची शक्यता

‘ओप्पो रेनो 8’मध्ये गेल्या वेळीसारखे तीन कॅमेरे देण्यात येण्याची शक्यता आहे. डिव्हाईसची लेंस 50 MP SONY IMX 766 शुटर असेल. ‘रिअल मी 9 Pro प्लस’, ‘वनप्लस नोर्ड 2’ तसेच ‘ओप्पो रेनो 7 Pro’लादेखील अशाच शूटरचा वापर करण्यात आलेला आहे. यात, दोन लेंसचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यात, एक अल्टावाइड लेंस आणि दुसरी टेलीफोटो लेंसचा वापर असणार आहे.

4) प्रोसेसर

ओप्पो रेनो 8 चे प्रोसेसरबाबत जास्त माहिती मिळू शकलेली नाही. रेनो सिरीजच्या मागील मॉडलमध्ये मीडियाटैक या स्नॅपडॅगनच्या टॉप ऑफ द लाईन चिपसेटचा वापर करण्यात आला होता. ‘ओप्पो रेनो 7 प्रो’च्या पार्श्वभूमीवर डाईमेंशन 1200 मॅक्स चिपचा वापर केला आहे. त्यामुळे रेनो 8 डाइमेंशन 1200 चिपच्या अपडेट व्हेरिएंटला सपोर्ट करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

5) बॅटरी आणि चार्जिंग

बाहेर आलेल्या माहितीनुसार, मोबाईलमध्ये 4500 एमएएच किंवा 5000 एमएएचची बॅटरी क्षमता असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोबाईलच्या बोर्डवर 65 वॉट किंवा 80 वॉट चार्जिंग असण्याची आशा आहे.

6) अंदाजे किंमत

रेनो 8 च्या किंमतीबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नसले तरी, रेनो 7 ची भारतीय बाजारात 28 हजार 999 च्या जवळपास किंमत आहे. रेनो 8 देखील याच किंमतीच्या जवळपास असण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा:

WhatsApp मध्ये नवीन टूल मिळणार, युजर्सना फोटोंवर कलाकारी करण्याची संधी

10 हजारांच्या रेंजमधला Vivo स्मार्टफोन आणखी स्वस्त, कंपनीकडून किंमतीत कपात

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.