50MP कॅमेरा आणि AI फिचर्स असलेला Oppo Reno 14 5G सीरीज भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत
ओप्पो कंपनीने Reno 14 सीरीज लाँच केली आहे, या नवीन सीरीजमध्ये Reno 14 आणि Reno 14 pro दोन नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. तर यामध्ये मजबूत बॅटरी, पॉवरफूल चिपसेटसह अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. चला तर मग आजच्या या लेखात आपण या स्मार्टफोन्सची विक्री कधी सुरू होईल आणि त्यांची किंमत किती आहे ते जाणून घेऊयात...

Oppo ने भारतीय बाजारपेठेत त्यांचे नवीन Oppo Reno 14 5G आणि Oppo Reno 14 Pro 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. Oppo Reno 14 च्या सीरीजअंतर्गत लाँच केलेले हे दोन नवीन स्मार्टफोन दमदार बॅटरी, उत्तम कॅमेरा, आकर्षक डिझाईन आणि पॉवरफुल प्रोसेसरसह लाँच करण्यात आले आहेत. अशातच तुम्हाला देखील ओप्पोचे नवीन स्मार्ट फोन खरेदी करायचे आहे? तर आजच्या या लेखात या फोनची किंमत आणि फिचर्स बद्दल जाणून घेऊयात…
ओप्पो रेनो 14 5जी सीरीजची भारतातील किंमत
Oppo Reno 14 च्या 8 GB / 256 GB व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे. तर 12 GB / 256 GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आणि 12 GB / 512 GB असलेल्या व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. तर यामध्ये असलेल्या Pro व्हेरिएंटच्या 12 GB /256 GB व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आणि 12 GB /512 GB व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये आहे. तर Oppo Reno 14 सीरीजची विक्री 8 जुलैपासून कंपनीच्या साईटवर तसेच Amazon आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल.
Oppo व्हेरिएंटची या स्मार्टफोनशी होणार स्पर्धा
Oppo Reno 14 ची स्पर्धा Vivo V50 5G ज्याची किंमत 36,999 आहे, तर 38,999 किंमत असलेल्या Xiaomi 14 CIVI या स्मार्टफोनशी होणार आहे. तर Pro व्हेरिएंट iQOO 12 5G आणि Vivo V40 Pro या स्मार्टफोनशी देखील स्पर्धा होणार आहे.
Oppo Reno 14 Pro 5G स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: तर या फोनमध्ये 6.83-इंचाचा 1.5 K रिझोल्यूशनचा OLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे जो 1200 निट्स पीक ब्राइटनेस आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह तुम्हाला खरेदी करता येणार आहे.
चिपसेट: हा हँडसेट मीडियाटेक डायमेन्सिटी 8450 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
कॅमेरा: या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो आणि 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. कंपनीने फोनच्या पुढील बाजूस म्हणजेच सेल्फीसाठी सुद्धा 50 मेगापिक्सेलचा सेन्सर दिला आहे.
बॅटरी: 80 वॅट सुपरव्हीओसी आणि 50 वॅट एअरव्हीओसी चार्जिंग सपोर्टसह 6200 एमएएचची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे.
Oppo Reno 14 5G स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: या फोनमध्ये 6.59 इंचाचा 1.5 के रिझोल्यूशनचा OLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे.
चिपसेट: या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 प्रोसेसर वापरण्यात आलेला आहे.
कॅमेरा: तर या फोनमध्ये 50 MP सेल्फी कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये मागील बाजूस 50 MP प्रायमरी, 50 MP टेलिफोटो आणि 8 MPअल्ट्रा वाइड कॅमेरा आहे.
बॅटरी: 80 वॅट सुपरव्हीओसी चार्जिंग सपोर्टसह 6000 एमएएचची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे.