AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Railways Viral Video : पाकिस्तानात एवढ्या चांगल्या दर्जाच्या ट्रेन? सत्य नेमकं काय…. व्हिडीओ समोर येताच मोठी पोलखोल

Pakistan Railways Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानातील ट्रेन दिसत आहेत. पण व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी पाकिस्तानला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे... 'एसी ट्रेन बनवणं पाकिस्तानसाठी कठीण आहे आणि प्रीमियम ट्रेनटे स्वप्न पाहत आहेत...'

Pakistan Railways Viral Video : पाकिस्तानात एवढ्या चांगल्या दर्जाच्या ट्रेन? सत्य नेमकं काय.... व्हिडीओ समोर येताच मोठी पोलखोल
| Updated on: Jul 05, 2026 | 1:44 PM
Share

Pakistan Railways Viral Video : सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण पाकिस्तान येथील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. आता देखील एक व्हिडीओ सोशस मीडियावर तुफान व्हायरल होत असून, तो व्हिडीओ पाकिस्तानातील ट्रेनचा आहे. यावेळी पाकिस्तान रेल्वेने आपल्या ‘प्रीमियम कोच’चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला, परंतु कौतुक मिळण्याऐवजी या व्हिडिओवर अनेकांनी टीका केली. या व्हिडिओमध्ये आलिशान ट्रेनची भव्य अंतर्गत सजावट आणि आधुनिक सुविधा दाखवण्यात आल्या, तरीही अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ ‘एआय’ द्वारे तयार केल्याचा दावा करत पाकिस्तान रेल्वेवर टीका केली. काहींनी याला ‘एआय’ची कमाल मानल्ं, तर काहींनी पाकिस्तानच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?

पाकिस्तान रेल्वेने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, New Premium Coaches of Pakistan Railways Coming Soon! असं लिहिलं आहे. व्हिडीओमध्ये ट्रेनचे आलिशान कोच, आरामदायी सीट, मॉर्डन लायटिंग आणि भन्नाट सुविधांची एक झलक दाखवली आहे. पण व्हिडीओ समोर येताच, लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. सांगायचं झालं तर, व्हिडिओ पूर्णपणे ‘एआय द्वारे तयार केलेचं दिसून येतं आहे. अशात सोशल मीडियावर लोकांनी पाकिस्तान रेल्वेबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली असून, ट्रोल करत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया…

पाकिस्तान रेल्वेच्या या व्हिडिओवरून सोशल मीडियावर अनेकांनी खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. काहींनी हा व्हिडिओ एआयद्वारे तयार केला, असा अंदाज वर्तवला, तर काहींनी पाकिस्तानची रेल्वे व्यवस्था आणि सुरक्षेची स्थिती यांवर टीका केली. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘एआय’ वापरून व्हिडिओ बनवणं सोपं असले तरी, प्रत्यक्षात अशी ट्रेन उभारणं पाकिस्तानच्या क्षमतेपलीकडील गोष्ट आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, व्हिडिओमध्ये दाखवल्या जाणाऱ्या दृश्यांपेक्षा पाकिस्तान रेल्वेची प्रत्यक्ष स्थिती पूर्णपणे वेगळी आहे.

व्हिडीओवर कमेंट करत आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘देश आर्थिक संकटांचा सामना करत आहे आणि सरकार आलिशान ट्रेनची स्वप्न पाहत आहे …’, अनेकांनी तर पाकिस्तान ट्रेनच्या स्पीडवर देखील प्रश्न उपस्थित केला, ‘आधी ट्रेनची स्पीड वाढवा, जी आजही 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे…’, अन्य एक नेटकरी विनोदी अंदाजात म्हणाला, ‘या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी पाकिस्तानी लोकांना त्यांची किडनी विकावी लागेल.’, अन्य एक नेटकऱ्याने पाकिस्तानी सरकारवर निशाणा साधला आणि म्हणाला, ‘एआयने सरकारचं काम सोपं केलं आहे. आता खंरच असं काम करण्याची गरज नाही.’

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा