AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi: इन्स्टावर मोदींचा डंका…तरुणाईच्या गळ्यातील ताईत, 10 कोटी फॉलोअर्स असलेले जगातील पहिले नेते, ट्रम्प यांना टाकले मागे

PM Modi on Instagram: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्सचा विक्रम केला आहे. इतका मोठी फॅनफॉलोअर्स असलेले ते एकमेव नेते ठरले आहेत. 2014 मध्ये त्यांनी इन्स्टाग्रामवर खातं उघडलं होतं. एका तपात त्यांची लोकप्रियता ही शिखरावर पोहचली.

PM Modi: इन्स्टावर मोदींचा डंका...तरुणाईच्या गळ्यातील ताईत, 10 कोटी फॉलोअर्स असलेले जगातील पहिले नेते, ट्रम्प यांना टाकले मागे
पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्स्टाग्रामImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Feb 26, 2026 | 8:41 AM
Share

PM Modi on Instagram: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर 100 दशलक्ष म्हणजे 10 कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. हा एक विश्व विक्रम आहे. असा जागतिक रेकॉर्ड करणारे ते एकमेव नेते आहेत. त्यांनी 2014 मध्ये इन्स्टाग्राम खाते उघडले होते. तेव्हापासून त्यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता वाढत गेली. आज ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले आहेत. ते समाज माध्यमावरील एक प्रभावशाली आणि लोकप्रिय नेते असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यांनी फॉलोअर्सच्या बाबतीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा मागे टाकले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. तर या प्लॅटफॉर्मवर ते अनेकदा संवाद साधतात. विविध विषयांवर त्यांचे विचार मांडतात. त्यांची विविध विषयांवर सडेतोड विचार हे तरुणाईला आवडतात. त्यामुळे ते त्यांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. इन्स्टाग्राम हा तरुणाईचा प्लॅटफॉर्म मानल्या जातो. पंतप्रधान मोदी यांच्या काळात डिजिटल इंडियाने मोठी भरारी घेतली. 2014 ते 2026 पर्यंत कोट्यवधी भारतीयांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट आले. डिजटली ते त्यांच्या विचारांना व्यक्त करतात.

डोनाल्ड ट्रम्प यांना टाकले मागे

इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डंका वाजला. त्यांच्यानंतर या प्लॅटफॉर्मवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा क्रमांक आहे. त्यांचे 43.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे 15 दशलक्ष, ब्राझीलचे राष्ट्रपती लूला हे 14.4 दशलक्ष, तुर्कीचे राष्ट्रापती रजब तैयप एर्दोगान यांचे 11.6 दशलक्ष तर अर्जेंटिनाचे राष्ट्रपती जेवियर मिलेई यांचे 6.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

एकूण 1205 पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्टाग्रामवर आतापर्यंत 1205 पोस्ट केल्या आहेत. पंतप्रधान इन्स्टाग्रामवर कुणालाच फॉलो करत नाहीत. पण त्यांना फॉलो करणाऱ्यांचा आकडा हा 10 कोटींच्या पुढे गेला आहे. पंतप्रधान मोदी यांना फॉलो करणाऱ्यांचा आकडा 10 कोटीहून अधिक आहे. त्यावरून ते जगभरात लोकप्रिय, प्रभावशाली आणि प्रसिद्ध नेते असल्याचे यावरून समोर आले आहेत. नरेंद्र मोदी हे तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहेत. इन्स्टाग्राम हा तरुणाईचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म मानल्या जातो.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...