AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील सर्वात स्वस्त 5G फोन बाजारात, आज पहिला सेल, 128GB स्टोरेजसह 5000mAh चा तगडा बॅटरी बॅकअप

पोको (Poco) या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने मंगळवारी आपला पहिला 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. या फोनचे नाव Poco M3 Pro 5G असे आहे.

देशातील सर्वात स्वस्त 5G फोन बाजारात, आज पहिला सेल, 128GB स्टोरेजसह 5000mAh चा तगडा बॅटरी बॅकअप
Poco M3 Pro 5G
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 7:01 AM
Share

मुंबई : पोको (Poco) या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने मंगळवारी आपला पहिला 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. या फोनचे नाव Poco M3 Pro 5G असे आहे. हा स्मार्टफोन मे महिन्यात जागतिक बाजारात लाँच झाला होता आणि गेल्या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच होईल अशी अपेक्षा होती. तथापि, COVID-19 च्या परिस्थितीमुळे स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने मे महिन्यातील त्यांचे सर्व लॉन्च इव्हेंट रद्द केले. भारतातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळे कंपनी त्यांचा बहुप्रतीक्षित Poco M3 Pro 5G हा स्मार्टफोन 8 जून रोजी केला. आजपासून (13 जून) हा फोन खरेदीसाठी उपलब्ध होत आहे. (Poco M3 Pro 5G sale live on Flipkart from today, phone come up with Dimensity 700 SoC and 5000mAh battery)

हा स्मार्टफोन रेडमी नोट 10 एस, रेडमी 8 आणि पोकोचा स्वतःचा फोन पोको एक्स 3 सारख्या मिड रेंज डिव्हाइसेसना टक्कर देईल. आपण फोनच्या काही खास वैशिष्ट्यांविषयी चर्चा केली तर आपल्याला त्यात 90Hz एमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 700 SoC आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी मिळेल.

फोनची भारतातील किंमत

Poco M3 Pro 5G हा फोन भारतात 13,999 रुपये या किंमतीत लाँच केला आहे. यामध्ये तुम्हाला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस मिळेल. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसाठी तुम्हाला 15,999 रुपये मोजावे लागतील. या दोन्ही व्हेरिएंटची विक्री आजपासून (14 जून) फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. या फोनच्या पहिल्या सेलमध्ये युजर्सना 500 रुपयांची सूट मिळू शकते. हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे ज्यात ब्लू, पॉवर ब्लॅक आणि पोको यलो या रंगांचा समावेश आहे.

Poco M3 Pro 5G चे फीचर्स

Poco M3 Pro 5G मध्ये 6.5 इंचांचा FHD+LCD डॉट डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1100 निट्स ब्राइटनेट आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये डायनॅमिक स्विच फीचरही देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये 700 SoC Mali- G57 MC2 GPU प्रोसेसर देण्यात आला आहे. युजर्स या फोनची स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवू शकतात. Poco M3 Pro 5G MIUI 12 आधारित अँड्रॉयड 11 वर काम करेल. हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे, जो मीडियाटेक चिपसेटसह येतो.

इतर बातम्या

Flipkart Sale : Narzo 30 Pro, Realme X7 आणि Moto चे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदीची संधी

धमाकेदार ऑफर! 14 हजारांचा 5G स्मार्टफोन 699 रुपयांत खरेदीची संधी

48MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरीसह दमदार स्मार्टफोन बाजारात, किंमत फक्त 7999

(Poco M3 Pro 5G sale live on Flipkart from today, phone come up with Dimensity 700 SoC and 5000mAh battery)

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.