AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8340mAh बॅटरी असलेला Realme Pad X ची आजपासून विक्री… तब्बल ‘एवढी’ सूट…

जर तुम्हाला एखादी टॅबलेट खरेदी करायचा असेल तर ही योग्य वेळ आहे. कारण रिअलमीच्या टॅबलेटची विक्रीदेखील सुरु झाली असून त्यावर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. Realme Pad X ची आजपासून विक्री सुरू होत आहे. दुपारी 12 वाजल्यापासून Realme.com, ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि मेनलाइन चॅनेलवरून खरेदी करता येईल. त्याची किंमत 19,999 रुपयांपासून पुढे आहे.

8340mAh बॅटरी असलेला Realme Pad X ची आजपासून विक्री... तब्बल ‘एवढी’ सूट...
| Updated on: Aug 01, 2022 | 12:10 PM
Share

रिअलमीने (Realme) गेल्या महिन्यात भारतात रिअलमी पॅड एक्स (Realme Pad X) लाँच केले होते; आजपासून त्याची विक्री होत आहे. हे प्रोडक्ट भारतात रिअलमीच्या ऑनलाइन स्टोअर Realme.com, ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट (Flipkart) आणि मेनलाइन चॅनेलद्वारे दुपारी 12 वाजल्यापासून खरेदी केले जाऊ शकते. या प्रोडक्टची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली असली तर फीचर्सनुसार यात बदल करण्यात आला आहे. यासोबतच ग्राहकांना काही ऑफर्सही दिल्या जात आहेत. या लेखातून या प्रोडक्टच्या ऑफर्स आणि किंमतीबाबत जाणून घेणार आहोत.

किंमत आणि ऑफर

Realme Pad X टॅबलेट भारतात तीन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्याचा पहिला प्रकार 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह येतो. हे वाय-फाय कनेक्टिव्हिटीने सुसज्ज असून त्याची किंमत 19,999 रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 25,999 रुपये आहे. हे वायफाय आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे. त्याच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे. यात देखील वायफाय आणि 5G कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. ग्राहकांना एसबीआय आणि एचडीएफसी बँक कार्ड वापरण्यावर 2,000 रुपयांची विशेष सूट दिली जाईल. यासोबतच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरणाऱ्यांना 5 टक्के कॅशबॅक दिला जाईल. याव्यतिरिक्त, सर्व ग्राहकांना टॅबलेटच्या खरेदीवर YouTube Premium चे तीन महिन्यांचे फ्री सबक्रिप्शन मिळेल. Realme Pad X ग्लेशियर ब्लू आणि ग्लोइंग ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे.

काय आहेत फीचर्स?

हा टॅबलेट 450 निट्स पीक ब्राइटनेस, 1200 x 2000 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 84.5 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह 10.95 इंच WUXGA+ फुल व्यू एलसीडी डिसप्लेसह उपलब्ध आहे. ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G ने सुसज्ज आहे. यात 11 GB डायनॅमिक रॅम आहे. तसेच, त्याची स्टोरेज 512 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. Realme Pad X Realme UI 3.0 चालवतो. यात 13 MP रियर कॅमेरा आणि 8 MP वाइड-एंगल सेल्फी कॅमेरा आहे. हा टॅबलेट 33W डार्ट चार्जिंग सपोर्टसह 8340mAh बॅटरीसह उपलब्ध आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.