AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

18 मिनिटात 50 टक्के चार्ज होणार, Realme चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच

चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमीने नुकताच Realme V15 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे.

18 मिनिटात 50 टक्के चार्ज होणार, Realme चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच
| Updated on: Jan 08, 2021 | 1:18 PM
Share

बीजिंग : चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमीने नुकताच Realme V15 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन MediaTekDimensity 800U चिपसेट आणि 64 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सादर केला आहे. (Realme V15 5G smartphone launched in china with tripal camera setup and 4310 mAh battery)

रियलमीने चीनमध्ये लाँच केलेल्या या स्मार्टफोनच्या 6GB RAM आणि 128GB इंटर्नल स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 1,499 CNY (जवळपास 17,000 रुपये) इतकी आहे. लाँचिंग ऑफर म्हणून कंपनीने हा फोन 1,399 CNY (जवळपास 15,800 रुपये) इतक्या किंमतीत सादर केला आहे. तसेच कंपनीने Realme V15 5G चं 8GB रॅम + 128GB स्टोरेज असलेलं एक वेरिएंट लाँच केलं आहे. या स्मार्टफोनची किंमत 1,999 CNY (जवळपास 22,600 रुपये) इतकी आहे.

Realme V15 5G मधील स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचांचा Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 180Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. फोनच्या डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेरासाठी पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 16 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामधील प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. Realme V15 5G स्मार्टफोन 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग, UIS Max (अल्ट्रा इमेज स्टेबलाइजेशन) आणि 120 फ्रेम पर सेकेंड वर 1080p स्लो मोशन व्हिडीओ रिकॉर्ड करतो.

जबरदस्त बॅटरी

या फोनमध्ये 4,310mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी 50W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह बनवण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा फोन केवळ 18 मिनिटांमध्ये 50 टक्के चार्ज होऊ शकतो. रियलमीने हा स्मार्टफोन तीन व्हेरियंट्समध्ये सादर केला आहे. यामध्ये सिल्वर, ब्लू आणि ग्रेडिएंट कलर फिनिशचा पर्याय देण्यात आला आहे. 14 जानेवारीपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

हेही वाचा

Lava चा नवीन स्मार्ट फोन लॉन्च होणार, किंमत फक्त 5 हजार 499…!

4820mAh ची बॅटरी, 108MP चा मेन कॅमेरा, Xiaomi चा नव्या स्मार्टफोनची किंमत फक्त…

Nokia 5.3 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, नवीन किंमत किती?

(Realme V15 5G smartphone launched in china with tripal camera setup and 4310 mAh battery)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.