Nokia 5.3 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, नवीन किंमत किती?

नोकियाच्या या फोनमध्ये चार रिअर कॅमेरे आणि 64 जीबी स्टोरेज यासारखे फिचर्स आहेत. (Nokia 5.3 SmartPhone Price Drop)

Nokia 5.3 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, नवीन किंमत किती?
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 9:02 PM

नवी दिल्ली : HMD Global या कंपनीने देशभरातील नोकिया 5.3 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. त्यामुळे जर तुम्ही Nokia 5.3 हा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा अतिशय उत्तम पर्याय आहे. Nokia 5.3 हा स्मार्टफोन तब्बल एक हजाराने स्वस्त झाला आहे. नोकियाच्या या फोनमध्ये चार रिअर कॅमेरे आणि 64 जीबी स्टोरेज यासारखे फिचर्स आहेत. (Nokia 5.3 SmartPhone Price Drop)

नोकियाच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज वेरियंट आता 13 हजार 999 रुपयांऐवजी 12 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तर 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनही कमी किंमतीत मिळणार आहे. हा फोन तुम्हाला 15 हजार 999 ऐवजी 14 हजार 999 रुपयांना मिळू शकेल. हा फोन ग्राहक कंपनीच्या अधिकृत स्टोरमध्येही जाऊन खरेदी करु शकतात. Nokia 5.3 हा स्मार्टफोन Cyan, Sand आणि Charcoal या तीन रंगात उपलब्ध आहे.

Nokia 5.3 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स

नोकिया 5.3 या स्मार्टफोनमध्ये 6.55 इंच एचडी+ डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720×1600 पिक्सल इतकं आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 665 प्रोसेसर देण्यात आला आहे. नोकियाचा हा फोन 4 जीबी आणि 6 जीबी रॅम सोबत 64 जीबी इनबिल्ट स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये ड्यूअल सिम सपोर्ट आहे.

Nokia 5.3 या स्मार्टफोनमध्ये अँड्राईड 10 या ऑपरेटिंग सिस्टम आहे. या फोनमध्ये 4000 mAh बॅटरी बॅकअप आहे. तसेच या फोनच्या मागे फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आले आहे.

Nokia 5.3 या स्मार्टफोनमध्ये चार कॅमेरे आहेत. त्यातील 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा, 2 मेगापिक्सल डेप्थ आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. (Nokia 5.3 SmartPhone Price Drop)

संबंधित बातम्या : 

आता Whatsapp Web ची गरज नाही, लॅपटॉप, कॉम्प्युटरसाठी डिझाईन केलेलं नवं App लाँच

Xiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये तांत्रिक बिघाड, तक्रारींनंतर कंपनीने विक्री रोखली

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.