Xiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये तांत्रिक बिघाड, तक्रारींनंतर कंपनीने विक्री रोखली

स्मार्टफोन कंपनी शाओमीच्या एका स्मार्टफोनमध्ये अंड्रॉयड अपडेटचा पर्याय मिळाला होता. अंड्रॉयड अपडेट केल्यानंतर स्मार्टफोन वापरताना युजर्सना अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत.

Xiaomi च्या 'या' स्मार्टफोनमध्ये तांत्रिक बिघाड, तक्रारींनंतर कंपनीने विक्री रोखली
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 8:42 AM

मुंबई : स्मार्टफोन कंपनी शाओमीच्या (Xiaomi) एका स्मार्टफोनमध्ये अंड्रॉयड अपडेटचा पर्याय मिळाला होता. त्यानुसार युजर्सनी अंड्रॉयड अपडेट केल्यानंतर स्मार्टफोन वापरताना युजर्सना अनेक अडचणी येऊ लागल्या. तर काही युजर्सचा फोन बंद पडला आहे. याबाबत अनेक युजर्सकडून तक्रारी येऊ लागल्या. अखेर कंपनीने या तक्रारींकडे लक्ष दिले आणि भारतात या फोनची विक्री रोखली आहे. Mi A3 असं या स्मार्टफोनचं नावं आहे. (Xiaomi stops roll-out of Mi A3 devices after users complaints)

दरम्यान, अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे कंपनीकडे तक्रार केली होती. काहींनी तक्रार केली आहे की, “अंड्रॉयड 11 अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर त्यांचा फोन बंद पडला आहे”. शाओमी इंडियाने (Xiaomi India) सोमवारी याबाबत एक निवेदन जारी केलं आहे, त्यात कंपनीने म्हटलं आहे की, “Mi A3 या डिव्हाईसमध्ये नुकताच अंड्रॉयड 11 अपडेटचा पर्याय देण्यात आला होता. या अपडेटनंतर फोनबाबत युजर्सच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आम्ही हे अपडेट रोखलं आहे”.

Xiaomi कंपनीने 21 ऑगस्ट रोजी भारतात Mi A3 हा फोन लाँच केला होता. या फोनची किंमत 12,999 रुपये इतकी आहे. दरम्यान काही युजर्सनी तक्रार केली आहे की, “शाओमी सेंटर्समध्ये हा फोन दुरुस्त करण्यासाठी खूप जास्त पैसे मागितले जात आहेत”. याबाबत विचारले असता कंपनीने म्हटलं आहे की, “सर्व्हिस सेंटर्समध्ये युजर्सचा हा फोन मोफत दुरुस्त करुन दिला जाईल. यामध्ये स्मार्टफोनची वॉरंटी पाहिली जाणार नाही”.

मार्केट रिसर्च कंपनी आईडीसीच्या रिपोर्टनुसार 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत शाओमीची भारतीय बाजारात 25 टक्के हिस्सेदारी होती. यासह कंपनी भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये पहिल्या स्थानावर आहे. दरम्यान, कंपनीने Mi A3 मधील झालेल्या बिघाडाबाबत म्हटले आहे की, “युजर्सना होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. एक ब्रँड म्हणून आम्हाला ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव द्यायचा आहे. आम्ही आमची उत्पादने आणि सेवा सतत सुधारत राहू. ”

Xiaomi चा हा लेटेस्‍ट स्‍मार्टफोन स्‍टॉक अँड्रॉयड सॉफ्टवेअरसह येतो. फोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. सोबत एक 8 मेगापिक्सलची लेन्स आणि 2 मेगापिक्सलची लेन्स देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Special Story | 5G सह अपग्रेडेड तंत्रज्ञान आणि जबरदस्त फिचर्स असणारे स्मार्टफोन्स 2021 मध्ये लाँच होणार

Xiaomi च्या ‘या’ फोनचा मार्केटमध्ये धुमाकूळ, अवघ्या 5 मिनिटात 3.5 लाख स्मार्टफोन्सची विक्री

(Xiaomi stops roll-out of Mi A3 devices after users complaints)

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.