आता Whatsapp Web ची गरज नाही, लॅपटॉप, कॉम्प्युटरसाठी डिझाईन केलेलं नवं App लाँच

Whatsapp कंपनीने गेल्या वर्षी घोषणा केली होती की, Whatsapp वर जे डेस्कटॉप युजर्स आहेत लवकरच त्यांच्यासाठी कॉलिंग आणि व्हिडीओ कॉलिंग फिचर लाँच केलं जाणार आहे.

आता Whatsapp Web ची गरज नाही, लॅपटॉप, कॉम्प्युटरसाठी डिझाईन केलेलं नवं App लाँच
अक्षय चोरगे

|

Jan 05, 2021 | 11:45 AM

मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप Whatsapp नेहमीच युजर्सच्या मागणीनुसार अपडेट होत असतं. कंपनी युजर्सच्या मागणीनुसार सातत्याने नवनवे फिचर्स रोलआऊट करत असते. त्यामुळेच हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. अँड्रॉयड असो किंवा iOS व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने युजर्सच्या सोयीनुसार अपग्रेड होतंय. (Whatsapp new app for laptop users, here are the installation details)

कंपनीने गेल्या वर्षी घोषणा केली होती की, Whatsapp वर जे डेस्कटॉप युजर्स आहेत लवकरच त्यांच्यासाठी कॉलिंग आणि व्हिडीओ कॉलिंग फिचर लाँच केलं जाणार आहे. हे फिचर या वर्षी लाँच केलं जाऊ शकतं. परंतु त्याअगोदरच कंपनीने आयओएस आणि अँड्रॉयड युजर्ससाठी नवीन अ‍ॅप्लिकेशन लाँच केलं आहे.

या नव्या अ‍ॅपच्या सहाय्याने युजर्स फोन आणि लॅपटॉपवर Whatsapp खूप सहजपणे वापरु शकतील. गेल्या अनेक महिन्यांपासून युजर्सकडून मागणी केली जात होती की, कंपनीने डेस्कटॉप आणि लॅपटॉप युजर्ससाठी नवीन अ‍ॅप्लिकेशन बनवावं. दरम्यान कंपनीने युजर्सची ही मागणी पूर्ण करत नवीन अ‍ॅप लाँच केलं आहे.

नवीन अ‍ॅपचा वापर कसा करायचा?

⦁ सर्वात आधी तुम्हाला Whatsapp वेब पेज इंटरनेटवर सर्च करावं लागेल.

⦁ त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेस्कटॉपवर क्लिक करावं लागेल.

⦁ आता विंडोज 64 बिटसाठी एक फाईल डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

⦁ आता व्हॉट्सअ‍ॅपची 164MB साईज असलेली फाईल डाऊनलोड होईल.

⦁ डाऊनलोड झालेल्या फाईलवर क्लिक करुन नंतर अ‍ॅप इन्स्टॉल करा

⦁ त्यानंतर हे अ‍ॅप टूलबारवर पिन करुन ठेवता येईल आणि वापरताही येईल.

युजर्सची मागणी होती की, व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप, लॅपटॉप आणि मॅकसाठी एक नवीन अ‍ॅप लाँच करावं. दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीने युजर्सची ही मागणी पूर्ण करत न्यू इयर गिफ्ट दिलं आहे. हे अ‍ॅप तुम्ही कधीही लॉग इन आणि लॉग आऊट करु शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅप या अ‍ॅपमध्ये नवनवीन अडेट्सही देणार आहे. ज्याद्वारे दिवसेंदिवस तुम्ही अधिक चांगल्या आणि सहजतेने हे अ‍ॅप वापरु शकाल.

व्हॉटसॲप मल्टी डिवाईस सपोर्ट फिचर रोलआऊट होणार

व्हॉटसॲप कंपनी लवकरच मल्टी डिवाईस सपोर्ट फिचर रोलआऊट करणार आहे. या फिचर्समध्ये युजर्सना एकापेक्षा अनेक डिवाईसवरुन लॉग इन करता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनी यावर काम करत आहे. नुकतंच WhatsApp आणि iOS बीटा वर्जनमध्ये याचे ट्रायल सुरु करण्यात आलं आहे. यामुळे एकावेळी दोन डिवाईसमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे.

संबंधित बातम्या : 

WhatsApp लवकरच अपडेट होणार, यूजर्सला मिळणार ‘हे’ सहा अनोखे फीचर्स

WhatsApp मधील ‘या’ 5 दमदार फिचर्सचा वापर करायलाच हवा

येत्या 1 जानेवारीपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद होणार?

(Whatsapp new app for laptop users, here are the installation details)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें