4820mAh ची बॅटरी, 108MP चा मेन कॅमेरा, Xiaomi चा नव्या स्मार्टफोनची किंमत फक्त…

4820mAh ची बॅटरी, 108MP चा मेन कॅमेरा, Xiaomi चा नव्या स्मार्टफोनची किंमत फक्त...

Xiaomi ने Mi 10 सीरिजचे यापूर्वी Mi 10, Mi 10T आणि Mi 10T Pro हे स्मार्टफोन लाँच केले आहे. (Xiaomi Mi 10i Smartphone Launch In India)

Namrata Patil

|

Jan 05, 2021 | 10:42 PM

मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीला शाओमी (Xiaomi) या कंपनीने नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. शाओमी या कंपनीने भारतात Mi 10i हा स्मार्टफोन लाँच केला आहे. Mi 10 या स्मार्टफोन सीरिजमधील हा चौथा फोन आहे. येत्या 8 जानेवारीपासून या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. तर प्राईम मेंबर्ससाठी हा फोन 7 जानेवारीला उपलब्ध होणार आहे. (Xiaomi Mi 10i Smartphone Launch In India)

Xiaomi ने Mi 10 सीरिजचे यापूर्वी Mi 10, Mi 10T आणि Mi 10T Pro हे स्मार्टफोन लाँच केले आहे. सध्या मार्केटमध्ये या सर्व फोनची फार चलती आहे.

Xiaomi ने Mi 10i स्मार्टफोनचे तीन वेरिएंट लाँच केले आहेत. यातील 6GB+64GB, 6GB+128GB आणि 8GB+128GB असे तीन वेरिएंट उपलब्ध आहेत.

Xiaomi च्या Mi 10i स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 20 हजार 999 रुपये इतकी आहे. यात तुम्हाला 6GB+64GB स्टोरेजचा फोन खरेदी करता येऊ शकतो. 6GB+128GB स्टोरेजच्या फोनची किंमत ही 21 हजार 999 रुपये आहे. 8GB+128GB वेरिएंटचा फोन हा 23 हजार 999 रुपये इतका आहे.

Xiaomi च्या Mi 10i स्मार्टफोनची विक्री ही अमेझॉन इंडिया आणि mi.com वर 8 जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे. मात्र अमेझॉन इंडियाच्या प्राईम मेबर्ससाठी याचा सेल हा 7 जानेवारीपासून सुरु होणार आहे.

Mi 10i हा नवा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध आहे. यात Pacific Sunrise, Midnight Black, Atlantic Blue या तीन रंगांचा समावेश आहे.

शाओमीचा Mi 10i हा स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.67 इंच फुल HD+ आहे. या फोनच्या सुरक्षितेसाठी याला पुढे आणि मागे अशा दोन्ही ठिकाणी Corning Gorilla Glass देण्यात आली आहे. हा फोन IP53 रेटींगसोबत येत असल्याने त्याला धुळीपासून कोणतेही नुकसान होणार नाही.

शाओमीच्या Mi 10i या स्मार्टफोन मध्ये चार रियर कॅमेरे देण्यात आले आहे. यात 108MP मेन कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाईड-अँगल कॅमेरा, 2MP मायक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेऱ्याचा समावेश आहे. Mi 10i या नव्या स्मार्टफोनची बॅटरी 4820mAh इतकी आहे. (Xiaomi Mi 10i Smartphone Launch In India)

संबंधित बातम्या : 

आता Whatsapp Web ची गरज नाही, लॅपटॉप, कॉम्प्युटरसाठी डिझाईन केलेलं नवं App लाँच

Xiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये तांत्रिक बिघाड, तक्रारींनंतर कंपनीने विक्री रोखली

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें