Realme चा पहिला टॅब्लेट लाँचिंगसाठी सज्ज, आकर्षक डिझाईनसह जबरदस्त फीचर्स मिळणार

रियलमी (Realme) कंपनी लवकरच आपला पहिला टॅब्लेट लॉन्च करणार आहे. स्लॅशलिक्सने या टॅब्लेटचे फोटो लीक केले होते.

Realme चा पहिला टॅब्लेट लाँचिंगसाठी सज्ज, आकर्षक डिझाईनसह जबरदस्त फीचर्स मिळणार
Realme Pad

मुंबई : रियलमी (Realme) कंपनी लवकरच आपला पहिला टॅब्लेट लॉन्च करणार आहे. स्लॅशलिक्सने या टॅब्लेटचे फोटो लीक केले होते. कंपनीचे सीईओ माधव सेठ यांच्या म्हणण्यानुसार, कंपनी पहिल्या टॅबलेटसह आपला पहिला लॅपटॉप आणि रियलमी बुकदेखील बाजारात सादर करणार आहे. रियलमीने पुष्टी केली आहे की, ते त्यांचा पहिला टॅब्लेट जीटी स्मार्टफोनच्या ग्लोबल लाँचिंगदरम्यानच सादर करणार आहेत. (Realme will launch their first tablet, check features details)

आपण लीक्सवर विश्वास ठेवला तर कोणालाही हा टॅब्लेट आवडेल. या टॅब्लेटची रचना स्लिम असेल आणि कॅमेरा एका कोपऱ्यात दिला जाईल. या टॅबमध्ये अल्युमिनियमची फ्रेम दिली आहे. याचा अर्थ असा की, हे प्रीमियम डिव्हाइस असेल आणि त्यामध्ये फ्लॅगशिप हार्डवेअर देखील दिले जाऊ शकते. हा टॅब्लेट स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट आणि अधिक स्टोरेज स्पेससह येईल.

या टॅब्लेटच्या स्पेक्स आणि फीचर्सविषयी रिअलमीने कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. परंतु काही लीक्सनुसार हा टॅब्लेट सध्याच्या अँड्रॉइड 11 च्या लेटेस्ट अँड्रॉइड सिस्टमवर काम करेल. हा फोन कधी लाँच केला जाईल, याबाद्दल Realme ने अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

रियलमीचे सीईओ माधव सेठ आधीच म्हणाले आहेत की, ही सर्व उत्पादने महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांना आकर्षित करतील. आम्ही याबद्दल आधीच खूप उत्साही आहोत. कंपनी एमआय नोटबुक, आसुस, एचपी आणि लेनोव्हो लॅपटॉप या डिव्हाईसेसना टक्कर देतील अशी उत्पादने लाँच करणार आहे.

Realme चा किफायतशीर स्मार्टफोन लाँच

Realme ने गेल्या वर्षी सी सिरीज स्मार्टफोन लॉन्च केला होता, ज्याला C11 असे नाव देण्यात आले होते. यानंतर कंपनीने भारतात रियलमी नार्झो 20 आणि रियलमी नार्झो 30 5 जी लाँच केला. या व्यतिरिक्त, कंपनीने रियलमी सब युनिट Dizo अंतर्गत 2 फीचर फोन लाँच केले आहेत, Dizo स्टार 300 आणि Dizo स्टार 500 अशी या स्मार्टफोन्सची नावं आहेत. या फोनची किंमत 1999 रुपये इतकी आहे. पण आज कंपनीने आणखी एक फोन लाँच केला आहे, जो एक बजेट फोन आहे. हा फोन सी 11 ची सेकेंड जनरेशन म्हणून सादर करण्यात आला आहे. रियलमी C11 2021 असे या स्मार्टफोनचे नाव आहे.

भारतात हा फोन टेकनो स्पार्क गो 2021, लाव्हा झेड 2 मॅक्स, टेकनो स्पार्क 7 आणि रियलमी सी 21 या स्मार्टफोन्सना टक्कर देणार आहे. या स्मार्टफोनच्या किंमती अनुक्रमे 6699 रुपये, 7799 रुपये, 6999 रुपये आणि 7999 रुपये इतक्या आहेत. रियलमी सी 11 2021 च्या 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6999 रुपये इतकी आहे. हा फोन कूल ब्लू आणि कूल ग्रे या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन तुम्ही रियलमी.इन आणि फ्लिपकार्टवरून विकत घेऊ शकता.

इतर बातम्या

Vivo चा भारतीय बाजारात स्मार्टफोन लाँचिंगचा धडाका, किंमती आणि फीचर्स लीक

फेसबुक, ट्विटर आणि गुगलने या देशाला दिली धमकी; जाणून घ्या कारण

PHOTO | 58 लाख वेळा डाउनलोड केलेले हे अॅप्स काही मिनिटांतच उडवत होते फेसबुकचा सर्व डेटा, गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले

(Realme will launch their first tablet, check features details)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI