AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्व्ह्ड डिस्प्ले आणि 5800mAh बॅटरीसह दमदार फीचर्स असलेला रेडमीचा ‘हा’ 5G फोन झाला लाँच

तुम्ही जर 25 हजार रुपयांखालील नवीन फोनच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी रेडमी हा फोन या किमतीत लाँच झाला आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण हा फोन तुम्ही कोणत्या किमतीत खरेदी करू शकता ते जाणून घेऊयात.

कर्व्ह्ड डिस्प्ले आणि 5800mAh बॅटरीसह दमदार फीचर्स असलेला रेडमीचा 'हा' 5G फोन झाला लाँच
कर्व्ह्ड डिस्प्ले आणि 5800mAh बॅटरीसह दमदार फीचर्स असलेला रेडमीचा 'हा' 5G फोन झाला लाँचImage Credit source: RedMi
| Edited By: | Updated on: Apr 02, 2026 | 10:28 PM
Share

Redmi Note 15 SE 5G भारतात लाँच झाला आहे. हा नुकत्याच लाँच झालेल्या Redmi Note 15 5G ची एक स्पेशल एडिशन आहे. तीन रंगांच्या आणि तीन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 चिपसेट आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. चला या स्मार्टफोनची किंमत तसेच हा फोन विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल आणि यात कोणते फिचर्स आहेत ते जाणून घेऊयात.

भारतात रेडमी नोट 15 एसई 5G ची किंमत

भारतीय बाजारपेठेत 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 19 हजार 999 रूपये आहे. तर 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 21 हजार 999 रूपये तर 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 23 हजार 999 रूपये आहे. निवडक बँक कार्डांवर 2,000 रूपयांची सवलत देखील उपलब्ध आहे. तसेच या फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 7 एप्रिल रोजी फ्लिपकार्ट आणि शाओमी ऑनलाइन स्टोअरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा फोन कार्बन ब्लॅक, क्रिमसन रिझर्व्ह (लाल) आणि फ्रॉस्टेड व्हाइट रंगांमध्ये उपलब्ध असेल.

तर या फोनच्या स्पर्धेच्या बाबतीत बोलायचे झाले तर तो Vivo T5x 5G, Motorola Edge 60 Fusion 5G आणि Redmi Note 15 5G सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.

रेडमी नोट 15 एसई 5G फिचर्स

स्क्रीन: या फोनमध्ये 6.7-इंचाचा कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले आहे, हा फोन 120 Hz रिफ्रेश रेट आणि 3200 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेससह येतो.

चिपसेट: हा फोन 4nm आधारित स्नॅपड्रॅगन 6 जनरेशन 3 ऑक्टा कोअर प्रोसेसरवर चालतो.

कॅमेरा: या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून, त्यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी, यात 20 -मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे जो 4K/30 fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 5800 mAh ची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे, जी 45 वॉट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटी: या फोनमध्ये ड्युअल-बँड वाय-फाय, 4G LTE, ब्लूटूथ 5.1, एक USB टाइप-C पोर्ट आणि GPS दिले आहे. सुरक्षेसाठी, डिस्प्लेच्या खाली फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

ओएस: हा ड्युअल सिम फोन Android 15 वर आधारित HyperOS 2 वर चालतो.

आयपी रेटिंग: कंपनीचा दावा आहे की, हा फोन धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP65 + IP66 रेटिंगसह येतो.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....