रिलायन्स जियोचा सुपरफास्ट वेब ब्राऊझर JioPages लाँच, मराठीसह आठ भारतीय भाषा उपलब्ध

रिलायन्स जियोचा सुपरफास्ट वेब ब्राऊझर JioPages लाँच, मराठीसह आठ भारतीय भाषा उपलब्ध

मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने आता स्वतःचे वेब ब्राऊझर बाजारात आणले आहे. कंपनीने हे नवे वेब ब्राऊझर JioPages या नावाने लाँच केले आहे.

अक्षय चोरगे

|

Oct 21, 2020 | 11:51 PM

मुंबई : मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने आता स्वतःचे वेब ब्राऊझर बाजारात आणले आहे. कंपनीने हे नवे वेब ब्राऊझर JioPages या नावाने लाँच केले आहे. यावेळी रिलायन्स जियोने दावा केला आहे की, त्यांचा हा नवीन वेब ब्राऊझर खूप वेगवान आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. (Reliance Jio launched web browser called JioPages with 8 Indian language support)

डेटा सुरक्षेविषयीची आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. याचदरम्यान चिनी यूसी वेब ब्राऊझरवर बंदी आणण्यात आली. त्यामुळे जियो कंपनीला असे वाटत होते की, भारतीय बाजारात स्वतःचा वेब ब्राऊझर लाँच करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे जियोने त्यांचा JioPages हा वेब ब्राऊझर लाँच केला आहे. कंपनीने दावा केला आहे की, इतर ब्राऊझरपेक्षा जियोपेजेस हा वेब ब्राऊझर लोकांना त्यांच्या प्रायव्हसी आणि डेटावर पूर्ण नियंत्रण देतो.

JioPages हा ब्राऊझर शक्तिशाली क्रोमियम ब्लिन्क इंजिनवर तयार करण्यात आला आहे. JioPages संपूर्णपणे भारतात तयार आणि विकसित केला आहे. या ब्राऊझरमध्ये इंग्रजीव्यतिरिक्त आठ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये मराठी, तामिळ, गुजराती, तेलगू, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि बंगाली या भारतीय भाषा वापरता येतील.

या ब्राऊझरमध्ये युजरला पर्सनलाइज्ड होम स्क्रीन, पर्सनलाइज्ड थीम, पर्सनलाइज्ड कंटेन्ट, इन्फॉरमेटिव्ह कार्डस, भारतीय भाषांमधील कंटेन्ट, अॅडव्हान्स डाऊनलोड मॅनेजर, इन्कॉग्निटो मोड यासारख्या इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. Jiopages हा ब्राऊझर गुगल प्लेस्टोरमधून डाऊनलोड करुन वापरता येईल.

संबंधित बातम्या

2GB डेटाच्या ऐवजी 4GB डेटा, Vi डबल डेटा प्लॅनमध्ये 336GB डेटाचा फायदा

iPhone 12 घेताय? थोडं थांबा, कारण डुअल सिम मोडवर 5G चालणार नाही!

…तर तुमचेही WhatsApp चॅट लिक होऊ शकते; त्यापासून बचावासाठी ‘हे’ करा!

सणासुदीच्या मुहूर्तावर Gionee चा बजेट स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त 5499 रुपये, जाणून घ्या फिचर्स

(Reliance Jio launched web browser called JioPages with 8 Indian language support)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें