Reliance Jio च्या बेनिफिट प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 3GB डेटा मिळणार!

रिलायन्स जियोने सुरुवातीपासूनच स्वस्त प्लॅन्स आणि चांगल्या सुविधांद्वारे मार्केटवर पकड बनवली आहे.

Reliance Jio च्या बेनिफिट प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 3GB डेटा मिळणार!
अक्षय चोरगे

|

Oct 23, 2020 | 3:55 PM

मुंबई : रिलायन्स जियो (Reliance Jio) कंपनीने सुरुवातीपासूनच स्वस्त प्लॅन्स आणि चांगल्या सुविधांमुळे मार्केटवर पकड बनवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील इंटरनेटची गरज आता वाढली आहे. याच गोष्टीला डोळ्यासमोर ठेवून जियो कंपनीने बेनिफिट प्लॅन लाँच केले आहेत. (Reliance Jio launches new benefit plan with 3 GB data and unlimited calling)

यावेळी जियोने अनलिमिटेड कालिंगसह 3GB डेटा असलेला प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये कंपनीकडून ग्राहकांना एसएमसएस बेनिफिटदेखील मिळणार आहे. रिलायन्स जियोने त्यांच्या या प्रिपेड रिचार्जद्वारे तीन वेगवेगळे प्लॅन लाँच केले आहेत. ज्यामध्ये दररोज 3 जीबी डेटा दिला जाणार आहे. सोबतच ग्राहकाला अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट मिळणार आहे.

349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

ग्राहकाला रिलायन्स जियोच्या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा, जियो टू जियो अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100SMS दिले जात आहेत. तसेच जियोवरुन इतर नेटवर्कच्या ग्राहकांना कॉल करण्यासाठी 1000 मिनिटं आणि जियो अॅप्सचा फ्री अॅक्सेस मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल.

401 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जियोच्या 401 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 6GB अॅडिशनल डेटा दिला जात आहे. सोबतच इतर प्लॅनप्रमाणे दररोज 3GB डेटा, जियो टू जियो अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100SMS दिले जात आहेत. तसेच जियोवरुन इतर नेटवर्कच्या ग्राहकांना कॉल करण्यासाठी 1000 मिनिटं आणि जियो अॅप्सचा फ्री अॅक्सेस मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटीदेखील 28 दिवसांपर्यंत आहे. तसेच या प्लॅनसोबत यूजरला एक वर्षभर Disney+ Hotstar चं VIP सब्सक्रिप्शन दिलं जात आहे.

999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

999 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये युजरला दररोज 3GB डेटा, जियो टू जियो अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100SMS दिले जात आहेत. तसेच जियोवरुन इतर नेटवर्कच्या ग्राहकांना कॉल करण्यासाठी 3000 मिनिटं आणि जियो अॅप्सचा फ्री अॅक्सेस मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांपर्यंत आहे.

संबंधित बातम्या

सणासुदीच्या मुहूर्तावर ‘हे’ पाच किफायतशीर स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमती आणि फिचर्स

रिलायन्स जियोचा सुपरफास्ट वेब ब्राऊझर JioPages लाँच, मराठीसह आठ भारतीय भाषा उपलब्ध

iPhone 12 घेताय? थोडं थांबा, कारण डुअल सिम मोडवर 5G चालणार नाही!

…तर तुमचेही WhatsApp चॅट लिक होऊ शकते; त्यापासून बचावासाठी ‘हे’ करा!

Nokia 215 4G आणि Nokia 225 4G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Reliance Jio launches new benefit plan with 3 GB data and unlimited calling)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें