AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातील वायफायचा वेग कमी झाला आहे का? तर राउटरभोवती ठेवलेल्या ‘या’ गोष्टी काढून टाका ताबोडतोब

घरी वाय-फायची रेंज वारंवार डिस्कनेक्ट होत असेल किंवा स्पीड कमी असेल, तर त्याचे कारण कंपनी नसून राउटरभोवती ठेवलेल्या काही सामान्य गोष्टी असू शकतात. तुमच्या इंटरनेटचा स्पीड कोणत्या गोष्टी खराब करत आहेत ते जाणून घेऊयात...

घरातील वायफायचा वेग कमी झाला आहे का? तर राउटरभोवती ठेवलेल्या 'या' गोष्टी काढून टाका ताबोडतोब
wifi
| Edited By: | Updated on: Sep 11, 2025 | 11:59 PM
Share

आजकाल प्रत्येक घरात वाय-फाय राउटर आहे, परंतु अनेकवेळा इंटरनेट स्पीडबद्दल अनेकांच्या तक्रारी असतात. जेव्हा इंटरनेट स्पीड कमी होतो तेव्हा व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये व्यत्यय येणे, वेबपेज उघडण्यास विलंब आणि वारंवार नेटवर्क डिस्कनेक्ट होणे ही सामान्य समस्या सतावत असते. बर्‍याचदा लोकं याला कंपनीची सेवा चांगली नाही असे म्हणतात, परंतु खरे कारण म्हणजे घरात चुकीच्या ठिकाणी राउटर ठेवणे आणि त्याच्या जवळ ठेवलेल्या वस्तू देखील असू शकतात.

काच आणि धातू हे सिग्नलचे सर्वात मोठे शत्रू

वाय-फाय रेडिओ वेव्सवर काम करते. जर राउटरजवळ मोठे आरसे असतील तर सिग्नल रिफ्लेक्ट होऊ शकतात आणि दिशा बदलू शकतात आणि कव्हरेज कमी होते. त्याचप्रमाणे धातू जसे की लोखंड-स्टील देखील रेडिओ वेव्सना ब्लॉक करते, ज्यामुळे नेटवर्क कमकुवत होते. म्हणून राउटर कधीही काचेच्या किंवा धातूच्या वस्तूंजवळ ठेवू नये.

ब्लूटूथ डिव्हाइसमुळे वाय-फाय स्पीड कमी होते

स्पीकर्स, माऊस, कीबोर्ड सारख्या ब्लूटूथ डिव्हाइसेसचाही वाय-फायवर परिणाम होतो. खरं तर ब्लूटूथ आणि वाय-फाय दोन्ही 2.4 गीगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीवर चालतात. त्यामुळे वायफाय स्पीड मध्ये व्यत्यय वाढतो आणि इंटरनेटचा वेग कमी होतो. ब्लूटूथ गॅझेट्सपासून राउटर काही अंतरावर ठेवणे चांगले.

फर्निचर आणि कपाटांमध्ये राउटर ठेवू नका

जर राउटर लाकडी रॅक किंवा कपाटात ठेवला असेल तर सिग्नल योग्यरित्या बाहेर पडू शकत नाही. यामुळे कव्हरेज कमकुवत होते आणि कनेक्टिव्हिटी वारंवार तुटू शकते. राउटर नेहमी मोकळ्या आणि उंच ठिकाणी बसवावा जेणेकरून सिग्नल सर्व दिशेने समान प्रमाणात पसरेल.

स्वयंपाकघर आणि मायक्रोवेव्हपासून दूर ठेवा

स्वयंपाकघरात ठेवलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे वाय-फायला धोका निर्माण होतो. विशेषतः मायक्रोवेव्ह, जो 2.4 GHz वर चालतो आणि रेडिएशन लीक करतो. जर राउटर त्याच्या जवळ ठेवला तर इंटरनेटची गुणवत्ता खराब होऊ शकते. म्हणून राउटर स्वयंपाकघरापासून दूर आणि घराच्या मध्यभागी ठेवणे केव्हाही चांगले.

वायफायचा वेग चांगला राहण्यासाठी योग्य ठिकाण निवडा

वाय-फायचा वेगवान वेग मिळविण्यासाठी फक्त एक चांगला प्लॅन असणे पुरेसे नाही. राउटर कुठे आणि कसा ठेवला आहे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर त्याच्याभोवती काच, धातू, ब्लूटूथ डिव्हाइस, कपाट किंवा मायक्रोवेव्ह सारख्या गोष्टी नसतील तर तुमच्या नेटचा वेग खरोखरच रॉकेटसारखा असू शकतो.

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.