AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Republic Day | प्रजासत्ताक दिनासाठी झेंडा, टोपीची करा खरेदी; 10 मिनिटांत होईल डिलिव्हरी

Republic Day | प्रजासत्ताक दिनाचा उत्सह ओसंडून वाहत आहे. तिरंगा, गांधी टोपी, साडी, नेहरु कुर्ता खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारात गर्दी उसळली आहे. पण तुम्हाला घरपोच हे सामान मिळू शकते. या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर साडी, कुर्ता, झेंडा आणि टोपीची खरेदी करता येईल. या प्लॅटफॉर्मवर कधीही सामानाची ऑर्डर करता येईल आणि 10 मिनिटांत या सामानाची डिलिव्हरी होणार आहे.

Republic Day | प्रजासत्ताक दिनासाठी झेंडा, टोपीची करा खरेदी; 10 मिनिटांत होईल डिलिव्हरी
| Updated on: Jan 25, 2024 | 2:56 PM
Share

नवी दिल्ली | 25 January 2024 : प्रजासत्ताक दिनाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. अनेक जण बाजारात जाऊन तिरंगा, गांधी टोपी, नेहरु कुर्ता, जॅकेट, साडी याची खरेदी करत आहेत. बाजारात गर्दी उसळली आहे. पण तुम्हाला या वस्तू घरपोच मिळू शकतात. शाळेपासून ते कार्यालयीन वस्तू, साहित्यापर्यंत अनेक सामान या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सहज खरेदी करता येते. यामध्ये साडी, कुर्ता, झेंडा यांची ही खरेदी करता येईल.फास्टेट डिलिव्हरी एप ब्लिंकिटने (Blinkit) खास प्रजासत्ताकसाठी ऑफर ठेवली आहे. या एपवर तुम्ही साहित्य, सामानाची ऑर्डर देऊ शकता. हे साहित्य तुम्हाला अवघ्या 10 मिनिटात डिलिव्हर होईल.

  1. National Golden Emblem Flag Table Cross – हा Table Cross तुम्ही तुमच्या कारच्या बोर्डवर लावू शकता. त्याची मूळ किंमत 249 रुपये आहे. पण प्रजासत्ताक दिनी त्यावर बंपर सूट देण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 60 टक्के डिस्काऊंटसह हा टेबल क्रॉस केवळ 99 रुपयांना खरेदी करता येईल.
  2. Navum Cotton Saree – गोल्डन बॉर्डर असलेली ही साडी 6.3 मीटरची आहे. ही साडी तुम्हाला ब्लिंकिटवर अवघ्या 599 रुपयांना उपलब्ध आहे. तर Cotton Veshti वर 55 टक्क्यांची सवलत देण्यात आली आहे. Cotton Veshti तुम्हाला 399 रुपयांना खरेदी करता येईल.
  3. Tricolour Cap – ही फ्री साईज कॅप आहे. तिची मूळ किंमत 195 रुपये आहे. पण सध्या त्यावर ग्राहकांना 61 टक्क्यांची सवलत मिळत आहे. ही टोपी तुम्ही केवळ 75 रुपयांना खरेदी करु शकता. या कॅपवर ठळक शब्दात I LOVE MY INDIA असे लिहिलेले आहे. ही कॅप दिसायला पण एकदम खास आहे.
  4. या सामानावर एकदम सूट – कापडी झेंडा, स्टॉल, स्कार्फ, तोरण आणि मनगटी बँड सवलतीत खरेदी करता येतील. तुम्ही हे सामान एकाच प्लॅटफॉर्मवरुन मागवू शकता. त्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज नाही. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हे सामान 10 ते 20 मिनिटांत घरपोच मिळतील. पण तुमचे शहर त्यांच्या यादीत आहे की नाही, ते अगोदर तपासून पाहा.
  5. जलद सेवा – प्लॅटफॉर्मनुसार, हे सामान तुमच्या घरी 10 ते 20 मिनिटांत पोहचेल. पण अनेकदा वाहतूक समस्या अथवा एखाद्या अन्य कारणामुळे डिलिव्हरीसाठी उशीर लागू शकतो. पण लागलीच सामान पोहचविण्याचा प्रयत्न हा प्लॅटफॉर्म करणार आहे. ऑर्डर करण्यापूर्वी, संबंधित वस्तू, साहित्याविषयी इतर ग्राहकांनी काय प्रतिक्रिया दिल्या, ते जरुर वाचा.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.