6GB/128GB, सॅमसंगचा नवा स्मार्टफोन बाजारात, 3 हजारांच्या डिस्काऊंटसह सेल लाईव्ह

अनेक लीक्स आणि टीझर्सनंतर, सॅमसंगने गेल्या आठवड्यात आपला नवीन अफोर्बेडबल 5G स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी F42 5G भारतात लॉन्च केला. या फोनची सुरुवातीची किंमत 20,999 रुपये आहे.

6GB/128GB, सॅमसंगचा नवा स्मार्टफोन बाजारात, 3 हजारांच्या डिस्काऊंटसह सेल लाईव्ह
Samsung Galaxy F42 5G

मुंबई : अनेक लीक्स आणि टीझर्सनंतर, सॅमसंगने गेल्या आठवड्यात आपला नवीन अफोर्बेडबल 5G स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी F42 5G भारतात लॉन्च केला. या फोनची सुरुवातीची किंमत 20,999 रुपये आहे. त्याच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास यात 90Hz चा रिफ्रेश रेट आणि MediaTek Dimension 700 चिपसेट आहे. या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे. हा स्मार्टफोन रियलमी X7 5G आणि Xiaomi Mi 10i शी स्पर्धा करेल. (Samsung Galaxy F42 5G sale live on flipkart with discount of 3000 rupees)

कसा आहे सॅमसंग गॅलेक्सी F42 5G?

सॅमसंग गॅलेक्सी F42 5G फोन दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे, त्यापैकी सुरुवातीचं व्हेरिएंट 20,999 रुपये किंमतीत लाँच करण्यात आलं आहे, जे 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसह सादर करण्यात आलं आहे. दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे आणि यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. तुम्ही हा सॅमसंग फोन फ्लिपकार्ट, सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करू शकता. तसेच 3 ऑक्टोबरपासून रिटेल स्टोअरवरही हा फोन उपलब्ध झाला आहे. दरम्यान, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान, हे दोन्ही फोन अनुक्रमे 17,999 रुपये आणि 19,999 रुपयांममध्ये खरेदी करु शकता.

सॅमसंग गॅलेक्सी F42 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी F42 5G फोन प्लास्टिक बॉडीसह तयार करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.6-इंच Infinity V डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल आहे. त्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. या रिफ्रेश रेटमुळे गेमिंग एक्सपीरियन्स आणि स्क्रोलिंग अधिक स्मूद होते.

या सॅमसंग मोबाईलमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर आहे, जो 8 जीबी रॅमसह येतो. या फोनमध्ये ड्युअल सिम आणि ड्युअल वायफाय बँड देण्यात आले आहेत. या फोनमध्ये ब्लूटूथ 5.0 आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी F42 5G चा कॅमेरा सेटअप

सॅमसंग गॅलेक्सी F42 5G च्या कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या रियर पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. 5 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देखील यामध्ये देण्यात आली आहे. तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे, जो डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी F42 5G ची बॅटरी आणि इतर फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी एफ 42 5 जी 5000 mAh बॅटरीद्वारे सपोर्टेड आहे, जी 15W फास्ट चार्जिंगसह येते. या फोनमध्ये उजवीकडे फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, जो बायोमेट्रिक पद्धतीने स्मार्टफोन अनलॉक करण्याचे काम करतो.

इतर बातम्या

6GB/256GB, 50 MP कॅमेरासह ओप्पोचा किफायतशीर स्मार्टफोन लाँच, अमेझॉनवर डिस्काऊंट

8-inch HD डिस्प्ले, दमदार प्रोसेसरसह Moto Tab G20 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Flipkart Big Billion Days 2021 : Flipkart बिग बिलियन डेज 2021 मध्ये उपलब्ध असलेले टॉप स्मार्टफोन्स

(Samsung Galaxy F42 5G sale live on flipkart with discount of 3000 rupees)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI