Samsung Galaxy M12 चा धुमाकूळ, अमेझॉनवर सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोन्सच्या यादीत अव्वल

| Updated on: Mar 22, 2021 | 7:10 AM

Samsung galaxy m12 स्मार्टफोन भारतात विक्रीच्या पहिल्या दिवशी अमेझॉनच्या बेस्ट सेलिंग यादीमध्ये अव्वल स्थान मिळवणारा स्मार्टफोन ठरला आहे

Samsung Galaxy M12 चा धुमाकूळ, अमेझॉनवर सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोन्सच्या यादीत अव्वल
Samsung galaxy m12
Follow us on

मुंबई : सॅमसंगने शनिवारी जाहीर केले की त्यांचा गॅलेक्सी एम 12 (Samsung galaxy m12) स्मार्टफोन भारतात विक्रीच्या पहिल्या दिवशी अमेझॉनच्या बेस्ट सेलिंग यादीमध्ये अव्वल स्थान मिळवणारा स्मार्टफोन ठरला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, गॅलेक्सी एम 12 विक्रीच्या 48 तासात ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉनवर सर्वाधिक विक्री झालेला फोन ठरला आहे. (Samsung galaxy m12 record sales amazon india, beats galaxy m11)

रेकॉर्डब्रेक विक्री

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “गॅलेक्सी एम 11 (2020), गॅलेक्सी एम 21 (2020) आणि त्यानंतर गॅलेक्सी एम 12 नेही पहिल्याच दिवशी विक्रीच्या बाबतीत एक नवीन विक्रम नोंदविला आहे. पहिल्या दिवशी झालेल्या विक्रीच्या बाबतीत गॅलेक्सी एम 12 यावर्षी बाजारात आलेल्या गॅलेक्सी एम 2 एस पेक्षा सरस ठरला आहे. या फोनची विक्री एम 2 एस पेक्षा 3.65 पट जास्त होती. ”

Samsung Galaxy M12 ची किंमत

गॅलेक्सी एम 12 दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनची खासियत म्हणजे यामध्ये कंपनीने 6000 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनच्या 4 जीबी प्लस 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आणि 6 जीबी प्लस 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना सॅमसंग, अमेझॉनच्या वेबसाइटवर आणि निवडक किरकोळ स्टोअरवरही 1000 रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळेल.

Samsung Galaxy M12 चे फीचर्स

Samsung Galaxy M12 स्मार्टफोन ऑक्टाकोर Exynos 850 प्रोसेसरने पॉवर्ड आहे. यामध्ये 3GB/4GB/6GB रॅम देण्यात आला आहे. तसेच याच्या स्टोरेजबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 32GB, 64GB आणि 128GB स्टोरेज स्पेसचे पर्याय देण्यात आले आहेत. युजर्स ही स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवू शकतात.

या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ Infinity V डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 720×1600 पिक्सल रेजोल्यूशनसह येतो. हा स्मार्टफोन Android 11 वर बेस्ड One UI3 वर चालतो. यामध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M12 चा कॅमेरा

कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास Samsung Galaxy M12 स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी सेन्सर 48 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच या फोनमध्ये पॉवरसाठी 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 15W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी LAVA चे तीन शानदार टॅबलेट्स लाँच, किंमती 9,499 रुपयांपासून

6GB-128GB, 48MP कॅमेरासह Micromax चा ब्लॉकबस्टर फोन लाँच, किंमत अवघी 9999

लाँचिंगपूर्वीच Poco X3 Pro ची किंमत आणि फीचर्स लीक

(Samsung galaxy m12 record sales amazon india, beats galaxy m11)