लाँचिंगपूर्वीच Poco X3 Pro ची किंमत आणि फीचर्स लीक

हा फोन अलीकडेच नवीन कॉन्फिगरेशन, किंमत आणि रंग पर्यायांसह युरोपियन किरकोळ विक्रेत्या वेबसाईट्सवर पाहायला मिळाला आहे.

लाँचिंगपूर्वीच Poco X3 Pro ची किंमत आणि फीचर्स लीक
Poco X3 Pro

मुंबई : पोको एक्स 3 प्रो (Poco X3 Pro) स्मार्टफोनची लाँचिंग डेट जवळ आली आहे. कंपनी हा फोन भारतात 30 मार्च आणि 22 मार्च रोजी जागतिक स्तरावर लाँच करु शकते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, फोन लाँच होण्यापूर्वी त्याची किंमत समोर आली आहे. (Price and features of Poco X3 Pro leaked before its launch)

हा फोन अलीकडेच नवीन कॉन्फिगरेशन, किंमत आणि रंग पर्यायांसह युरोपियन किरकोळ विक्रेत्या वेबसाईट्सवर पाहायला मिळाला आहे. पोको एक्स 3 प्रो कंपनी दोन RAM आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करु शकते, ज्याची किंमत 269 युरो (अंदाजे 23,300 रुपये) असू शकते.

Poco X3 Pro ची अंदाजित किंमत

Dealntech च्या लिस्टिंगनुसार, पोको एक्स 3 प्रो (Poco X3 Pro) स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह येईल, ज्याची किंमत 269 युरो असू शकते. त्याच वेळी, 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 319 युरो (सुमारे 27,600 रुपये) असू शकते. हे दोन्ही स्मार्टफोन फ्रॉस्ट ब्लू, मेटल ब्रॉन्झ आणि फँटम ब्लॅक कलरमध्ये येणार आहेत.

कंपनीने आपल्या ट्विटर हँडल @IndiaPOCO वरून ट्विट केले आहे की, कंपनी 30 मार्चला लाँच होणार्‍या आपल्या प्रो स्मार्टफोनसह प्राईस-परफॉर्मंस रेश्यो ब्रेक करेल. या फोनच्या भारतातील किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची सुरुवातीची किंमत 21,000 रुपये असू शकते.

असं म्हटलं जातंय की, Poco X3 Pro भारतात 30 मार्चला लाँच होण्याची शक्यता आहे, तर 22 मार्च रोजी तो जागतिक स्तरावर लाँच होईल. दरम्यान कंपनीने अद्याप स्वतःहून याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. कंपनीने हेदेखील सांगितलेलं नाही की, ते नेमका कोणता स्मार्टफोन लाँच करणार आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, कंपनी Poco X3 Pro लाँच करणार आहे. तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, कंपनी Poco X3 Pro आणि Poco F3/ Poco F3 Pro हे स्मार्टफोन लाँच करु शकते.

Poco X3 Pro चे एक्सपेक्टेड स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये फुल HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. यासह यामध्ये Qualcomm Snapdragon 860 SoC प्रोसेसर मिळू शकतो. यामध्ये 5,200mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. गेल्या महिन्यात FCC लिस्टिंगमधून माहिती मिळाली होती की, Poco X3 Pro मध्ये 4G LTE, डुअल-बँड Wi-Fi आणि NFC मिळेल. परंतु यामध्ये 5G कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे.

या फोनच्या लाँचिंगबाबत, किंमत अथवा स्पेसिफिकेशनबाबत कंपनीने स्वतःहून कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. तसेच कंपनीने फोनचं नावदेखील अद्याप जाहीर केलेलं नाही. परंतु टीझर आणि मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार पोको कंपनी या महिन्यात Poco X3 Pro हा स्मार्टफोन लाँच करणार आहे.

इतर बातम्या

10000 हून कमी किंमत असलेल्या Realme च्या ‘या’ फोनवर 1000 रुपयांची सूट

Oppo लवकरच फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार, सॅमसंग आणि गुगलही स्पर्धेत

8GB/128GB, 108MP कॅमेरासह Realme दमदार स्मार्टफोन लाँच करणार

(Price and features of Poco X3 Pro leaked before its launch)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI