AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांसाठी LAVA चे तीन शानदार टॅबलेट्स लाँच, किंमती 9,499 रुपयांपासून

ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्थानिक स्मार्टफोन ब्रँड लाव्हाने (LAVA) तीन नवीन स्टुडंट सेंट्रिक टॅबलेट लाँच केले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी LAVA चे तीन शानदार टॅबलेट्स लाँच, किंमती 9,499 रुपयांपासून
| Edited By: | Updated on: Mar 21, 2021 | 7:05 AM
Share

मुंबई : ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्थानिक स्मार्टफोन ब्रँड लाव्हाने (LAVA) 9,499 रुपयांपासून तीन नवीन स्टुडंट सेंट्रिक टॅबलेट लाँच केले आहेत. लाव्हा मॅग्नम एक्सएल, लाव्हा ऑरा आणि लाव्हा आयव्हरी असे तीन नवीन टॅबलेट्स कंपनीने लाँच केले आहेत. त्यांच्या किंमती अनुक्रमे 15,499, 12,999 रुपये आणि 9,499 रुपये अशा आहेत. हे टॅब्लेट केवळ फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. (LAVA introduced three tablets for students price starts at Rs 9499)

लाव्हा इंटरनॅशनल लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि बिझिनेस हेड सुनील रैना यांनी दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “या नवीन उत्पादनांमुळे आम्ही आशा करतो की, या कोव्हिड काळातही कंपनीचा अधिक विकास करण्यात मदत होईल.” रैना म्हणाले की, “लर्निंग फ्रॉम होम (घरातून शिकणे) ही प्रक्रिया अगदी सहज केली जाऊ शकते. तसेच लागोपाठ लेक्चर्स जरी असले तरी या टॅबलेट्सची बॅटरी लवकर संपणार नाही, याची काळजी कंपनीने घेतली आहे.

Lava टॅबलेट्समध्ये काय आहे खास

Lava magnum XL मोठ्या 10.1 इंचांच्या स्क्रीन आणि 6100 एमएएच बॅटरीसह देण्यात आला आहे. स्क्रीनवर आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे ज्यामध्ये 390 निट ब्राइटनेस आहे, जेणेकरुन विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवू नये आणि सुरक्षितता राखली जाईल. यात 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा तसेच 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. टॅब्लेट मीडियाटेक 2 गीगाहर्ट्ज क्वाड कोर प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे आणि त्यात 32 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे, जी 256 जीबी पर्यंत वाढविली जाऊ शकते.

कसे आहेत Lava Aura आणि Lava Ivory

दुसरीकडे, Lava Aura 8 इंचांची स्क्रीन आणि दीर्घकाळ चालणाऱ्या 5100 एमएएच बॅटरीसह येतो. या टॅब्लेटमध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा टॅबलेट मीडियाटेक 2 गीगाहर्ट्झ क्वाड कोर प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. याशिवाय Lava Ivory 7 इंचांची स्क्रीन, 5 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेरासह येतो. दरम्यान, कंपनीने विद्यार्थ्यांना विनामूल्य अभ्यासक्रम ऑफर करण्यासाठी एडुसक्षमबरोबर भागीदारी जाहीर केली आहे.

इतर बातम्या

6GB-128GB, 48MP कॅमेरासह Micromax चा ब्लॉकबस्टर फोन लाँच, किंमत अवघी 9999

5 हजाराहून कमी किंमतीत खरेदी करा Samsung Galaxy चा फोन, धमाकेदार आहे ऑफर

48MP कॅमेरा, 6,000 mAh बॅटरी, किंमत फक्त 9999, Moto चा दमदार फोन विक्रीसाठी उपलब्ध

(LAVA introduced three tablets for students price starts at Rs 9499)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.