सेल्फीत दिसतायेत उलटी अक्षरे? मग ‘ही’ एक सेटिंग लगेच बदला
सेल्फी घेताना बोर्डावरील मजकूर उलटा दिसतोय का? हा अनुभव अनेकांना येतो, पण त्यावर तुमच्या iPhone किंवा Android फोनमध्ये एक सोपी सेटिंग आहे. ती बंद केली, की फोटो आणि व्हिडिओमध्ये सर्व काही स्पष्ट आणि सरळ दिसू लागेल.

तुमच्यासोबत असं कधी घडलंय का, की तुम्ही सेल्फी किंवा सेल्फी व्हिडिओ घेतला आणि नंतर पाहिलं, की पाठीमागे लिहिलेला मजकूर सगळा उलटा दिसतो आहे? उदाहरणार्थ, SAVE WATER चं ‘RETAV EVAS’ असं काहीसं दिसतं. हे तुमच्या फोटोचं किंवा चार्टचं चुकून लिहिलं गेलं नाही, तर यामागे कारण आहे तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याची एक सेटिंग.
हे फक्त अँड्रॉइड किंवा आयफोनपैकी एकाच युजरसोबत होत नाही, तर दोघांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. मात्र, चांगली बातमी ही की ही समस्या एका बटणाने दूर होऊ शकते.
iPhone वापरकर्त्यांसाठी उपाय :
1. आपल्या iPhone मध्ये Settings मध्ये जा.
2. खाली स्क्रोल करून Camera वर टॅप करा.
3. त्यात Mirror Front Camera किंवा Mirror Front Photos नावाचा पर्याय असेल.
4. तो Off करा.
5. यानंतर तुम्ही घेतलेली प्रत्येक सेल्फी किंवा व्हिडिओ क्लिप व्यवस्थित, मजकूर उलटा न दिसता, सरळ आणि स्पष्ट दिसेल.
Android वापरकर्त्यांसाठी टिप्स :
1. Camera App उघडा.
2. Selfie Mode मध्ये जा.
3. आता Settings मध्ये Mirror Selfie, Flip Selfie किंवा Save as Previewed अशा पर्यायांकडे लक्ष द्या.
4. हे सर्व पर्याय Off करा.
5. आता तुमची प्रत्येक सेल्फी मजकूरासह परफेक्ट दिसेल.
लॅपटॉप किंवा वेबकॅमसाठी उपाय:
1. बर्याच वेळा कॅमेऱ्याचा प्रिव्ह्यू उलटा असतो, पण सेव केलेला फोटो किंवा व्हिडिओ योग्य असतो. त्यामुळे सेव झालेला व्हिडिओ किंवा फोटो नक्की एकदा तपासा.
2. जर सेटिंगमध्ये Mirror Option नसेल, तर Snapseed, PicsArt किंवा Photoshop सारख्या अॅप्समधून फोटो फ्लिप करता येतो.
थर्ड पार्टी अॅप्सचा वापर :
तुम्ही अँड्रॉइडवर Open Camera किंवा iPhone वर ProCamera सारखे थर्ड पार्टी अॅप्स वापरू शकता, ज्यात सरळ सेल्फी मिळवण्यासाठी सुस्पष्ट पर्याय असतात.
शेवटचं सांगायचं झालं तर…
आता पुढच्या वेळी तुम्ही प्रोजेक्ट सादर करत असाल, चार्टशीट पकडून व्हिडिओ करत असाल किंवा एखाद्या बोर्डासोबत फोटो घेणार असाल, तर ही सेटिंग आधी बदलून घ्या.