अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनविला स्मार्ट जोडा, मुलांचे अपहरण रोखण्यात निभविणार महत्त्वाची भूमिका

नितीश गाडगे,  Tv9 मराठी

|

Updated on: Dec 09, 2022 | 12:24 PM

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी असे जोडे विकसित केले आहेत जे आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनविला स्मार्ट जोडा, मुलांचे अपहरण रोखण्यात निभविणार महत्त्वाची भूमिका
स्मार्ट शूज
Image Credit source: Social Media

गोरखपूर, येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी असा बूट (Smart Shoes) बनवला आहे जो कोणत्याही आपत्तीच्या वेळी लोकांचे प्राण प्राण वाचविण्यात आणि मदत पुरविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. हे स्मार्ट जोडे बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी शूज, जीपीएस ट्रॅकर (GPS Tracker), हार्टबीट सेन्सर, टेम्परेचर सेन्सर, जीएसएम सिम, चिप, वायर, मोबाईल आदी तांत्रिक बाबींचा वापर केला आहे.

लहान मुलांचे अपहरण रोखणे, भूकंप आणि इतर आपत्तींमध्ये लोकांचे जीवन सुरक्षित करणे हे बूट बनवण्याचा उद्देश आहे. हा जोडा घातलेला माणूस ढिगाऱ्याखाली गाडला गेला तर त्याला सहज शोधून बाहेर काढता येईल.

मुलांच्या अपहरण प्रकरणात निभावू शकते महत्त्वाची भूमिका

मोबाईलमुळे लोकेशन ट्रॅक होऊ शकते हे आता सगळ्यांनाच माहिती आहे मात्र जोड्यांमध्ये जीपीएस ट्रॅकर असल्यास एखाद्या मुलाचे अपहरण झाल्यावर त्याचे स्थान शोधणे सोपे जाईल. याद्वारे डोंगराळ आणि बर्फाच्छादित भागात वादळात एखादी व्यक्ती अडकली तर त्यालाही सहज सापडू शकते.

हे सुद्धा वाचा

हा स्मार्ट शू बनवणाऱ्या आदित्य सिंग या विद्यार्थ्याने सांगितले की, आम्ही बनवलेल्या शूमध्ये जीपीएस ट्रॅकर, हार्ट बीट सेन्सर, टेम्परेचर सेन्सर आहे आणि तो जीएसएम मोडला जोडलेला आहे.

आदित्य म्हणाला, ‘जर आपण असे शूज घालत राहिलो आणि घाबरलेल्या स्थितीत असलो, तर एक नोटिफिकेशन कॉल  पालकांना आणि पोलिसांकडे जाईल की मूल किंवा इतर कोणतीही व्यक्ती, महिला संकटात आहे. शूजच्या तंत्राविषयी विद्यार्थ्यांनी सांगितले की, जर आपण नर्व्हस झालो तर आपला तळवा थंड होतो.

अशा स्थितीत शूजमध्ये बसवलेल्या टेम्परेचर सेन्सरद्वारे तापमानाची जाणीव होताच पालकांना जीपीएस मोडमध्ये कॉल केला जाईल. त्याचबरोबर जीपीएसच्या माध्यमातून मुलांचा माग काढता येणे शक्य होईल.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI