AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IITपेक्षा वरचढ ठरणारी देशातील ही Top 20 Engineering Colleges! महाराष्ट्रातलं कोणतं?

पल्या देशात असे अनेक कॉलेज आहेत बरं का जे आयआयटी कॉलेजला सुद्धा टक्कर देतात. हे इंजिनिअरिंग कॉलेज आयआयटी कॉलेज पेक्षा रँकिंग मध्ये वर आहेत. आता JoSAA चं समुपदेशन सुरु होईल त्या आधी ही यादी तपासा.

IITपेक्षा वरचढ ठरणारी देशातील ही Top 20 Engineering Colleges! महाराष्ट्रातलं कोणतं?
Top 20 Engineering CollegesImage Credit source: Tv9
| Updated on: Sep 14, 2022 | 2:34 PM
Share

आयआयटी कॉलेज (IIT College) मध्ये प्रवेश घेणं हे जवळपास सगळ्याच इंजिनिअरिंगला (Engineering) जाऊ इच्छिणाऱ्या मुलांचं स्वप्न असतं. मुलं यासाठी प्रचंड मेहनत घेतात. पण प्रत्येक शाखा, कॉलेज या सगळ्याची संख्या मर्यादित असते. कट ऑफ पण वेगवेगेळे आणि जबरदस्त असतात. मुलांना बरेचदा शिक्षणात गॅप घ्यायला जमत नाही. काही मुलं तर आयआयटीच्या हट्टापायी गॅप घेतात, पुन्हा जीव तोडून मेहनत घेतात. काहींना यश मिळतं काहींना नाही. पण आपल्या देशात असे अनेक कॉलेज आहेत बरं का जे आयआयटी कॉलेजला सुद्धा टक्कर देतात. हे इंजिनिअरिंग कॉलेज आयआयटी कॉलेज पेक्षा रँकिंग मध्ये वर आहेत. आता JoSAA चं समुपदेशन ( JoSAA Counselling) सुरु होईल त्या आधी ही यादी तपासा.

बीई, बीटेक, बी-प्लॅनिंग आणि बॅचलर ऑफ आर्किटेक्चर प्रवेशासाठी जोसा 2022 समुपदेशन प्रक्रिया सुरू झालीये. JoSAA चॉइस फिलिंगची प्रक्रिया 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालीये. पहिली मॉक सीट अलॉटमेंट (वाटप) 18 सप्टेंबर रोजी होणारे.

भारतात इंजिनीअरिंग (बीई, बीटेक) शिकण्याच्या दृष्टीने आयआयटी ही नेहमीच सर्वोच्च मानली जाते. अनेक मुलांचं ते स्वप्नंही असतं. इथे रँकिंगच्या बाबतीत अनेक आयआयटीच्या वर असणाऱ्या काही संस्थाची यादी दिलेली आहे.

अशा 20 कॉलेजांची नावं आहेत ज्यात तुम्ही आयआयटीमध्ये प्रवेश न मिळाल्यास अगदी डोळे झाकून प्रवेश घेऊ शकता कारण ही यादी एनआयआरएफ रँकिंग 2022 कडून जाहीर करण्यात आलीये.

संस्थेचे नाव /राज्य / एकूण NIRF रँक

  1. NIT Tiruchirapalli / तामिळनाडू / NIRF रँक 8
  2. NIT Surathkal/ कर्नाटक/  10
  3. जादवपुर यूनिवर्सिटी/ कोलकाता/ 11
  4. व्हीआयटी वेल्लोर (VIT Vellore)/ तामिळनाडू/ 12
  5. एन.आय.टी. राउरकेला (NIT Rourkela)/ ओडिसा/ 15
  6. अन्ना यूनिवर्सिटी/ तामिळनाडू/ 17
  7. इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी/ महाराष्ट्र/ 18
  8. अमृता विश्व विद्यापीठम/ तामिळनाडू/ 19
  9. एन.आय.टी. वारंगल/ तेलंगणा/ 21
  10. SRM इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी/ तामिळनाडू/ 24
  11. एमिटी यूनिवर्सिटी/ उत्तर प्रदेश/ 25
  12. जामिया मिलिया इस्लामिया/ नई दिल्ली/ 26
  13. शिक्षा ओ अनुसंधान/ ओडिसा/ 27
  14. थापर इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी/ पंजाब/ 28
  15. BITS Pilani/ राजस्थान/ 29
  16. NIT Calicut/ केरळ/ 31
  17. विश्वेश्वरैया नेशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी/ महाराष्ट्र/ 32
  18. एनआयटी दुर्गापूर/ पश्चिम बंगाल/ 34
  19. दिल्ली टेक्नॉलॉजिकल यूनिवर्सिटी (DTU)/ नई दिल्ली/ 35
  20. अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी (AMU)/ उत्तर प्रदेश/ 37
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.