तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे साईन दिसले तर व्हा सावध, तुमचे बँक खाते रिकामे होण्यापूर्वी करा ‘या’ सेटिंग्ज
जर तुमचा स्मार्टफोन वारंवार हँग होत असेल, बॅटरी लवकर संपत असेल किंवा तुम्हाला वेगवेगळे कॉल आणि मेसेज येत असतील तर सावधगिरी बाळगा. फोन हॅक झाल्याची ही लक्षणे असू शकतात. फोन हॅक झाला आहे की नाही हे तुम्ही कसे ओळखू शकता आणि ते कसे टाळायचे ते आजच्या या लेखात जाणून घेऊयात...

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. पण टेक्नॉलॉजी वाढत असताना सायबर गुन्ह्यांच्या घटनाही झपाट्याने वाढत आहेत. हॅकर्स नवीन पद्धतींचा अवलंब करून लोकांचे बँक खाते आणि वैयक्तिक डेटा हॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
अशातच तुमच्या एखाद्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे, जसे की बनावट लिंकवर क्लिक करणे किंवा एखाद्या अज्ञात अॅपला अॅक्सेस देणे, तुमचा संपूर्ण स्मार्टफोन हॅक होऊ शकतो. पण काळजी करण्याची गरज नाही, जर तुम्ही स्मार्टफोनच्या काही सेप्टी अलर्ट्स सूचना ओळखल्या तर तुम्ही स्वतःचे आणि तुमचे पैसे वाचवू शकता.
अशी ओळखा स्मार्टफोन हॅक झाल्याची चिन्हे
फोन स्वतःहून वारंवार चालू आणि बंद होत आहे. जर तुमचा स्मार्टफोन कोणत्याही कारणाशिवाय वारंवार ऑन आणि ऑफ होत असेल, तर हा एक मोठा इशारा आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की कोणीतरी रिमोट अॅक्सेसद्वारे तुमचा फोन नियंत्रित करत आहे.
तुम्ही तुमचा फोन नॉर्मल यूज करत असाल आणि त्यानंतरही तुमच्या फोनची बॅटरी पूर्वीपेक्षा जास्त वेगाने संपत असेल, तर याचा अर्थ असा होऊ शकतो की काही मेलवेअर किंवा स्पायवेअर बॅकग्राउंडमध्ये तूमचा फोन हॅक करून चालवत आहे आणि डेटा चोरत आहे.
जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून वारंवार कॉल किंवा मेसेज येत असतील, तर हे स्पष्ट लक्षण आहे की कोणीतरी तुमचा मोबाईल ट्रॅक करत आहे. जर तुमच्या नंबरवरून मेसेज आपोआप पाठवले जात असतील, तर ते देखील हॅकरचे काम असू शकते.
फोन हळू चालणे, हँग होणे किंवा अॅप्स आपोआप उघडणे ही सर्व लक्षणे फोनमध्ये काही धोकादायक सॉफ्टवेअर चालू असल्याची संकेत आहेत.
जर तुमचा इंटरनेट डेटा अचानक वेगाने संपू लागला, तर हे तुमच्या फोनवरून कोणीतरी डेटा ट्रान्सफर करत असल्याचे लक्षण असू शकते.
जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये वरील चिन्हे दिसत असतील तर घाबरू नका. खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून, तुम्ही तुमचे डिव्हाइस आणि डेटा सुरक्षित ठेवू शकता.
Factory Data Reset करा
तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा फोन हॅक झाला आहे, तर ताबडतोब तुमचा फोन Factory Data Reset करा. यामुळे तुमच्या फोनवरील सर्व डेटा डिलीट होईल आणि कोणतेही धोकादायक अॅप्स किंवा व्हायरस देखील काढून टाकले जातील. पण त्यापूर्वी, महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घ्या.
अधिकृत अॅप स्टोअर वरून अॅप डाउनलोड करा
फक्त गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून अॅप डाउनलोड करा. कोणत्याही थर्ड पार्टी किंवा अज्ञात वेबसाइटवरून अॅप डाउनलोड करू नका.
अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका
एसएमएस, ईमेल किंवा व्हॉट्सअॅपद्वारे आलेल्या कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळा. हॅकर्स याद्वारे तुमच्या फोनमध्ये व्हायरस टाकतात.
अॅप्सना अॅक्सेस देण्यापूर्वी विचार करा
जेव्हा कोणतेही अॅप तुमच्या मायक्रोफोन, कॅमेरा किंवा कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये प्रवेश मागते तेव्हा प्रथम ते अॅप विश्वसनीय आहे की नाही ते तपासा. त्याच्या पुनरावलोकने आणि रेटिंगकडे लक्ष द्या.
ओटीपी आणि पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका
जर कोणी तुम्हाला फोन करून OTP विचारत असेल तर सावधगिरी बाळगा. बँका, UPI किंवा कोणतीही संस्था कधीही फोनवरून OTP विचारत नाही.
तुमच्या स्मार्टफोनची सुरक्षा सेटिंग्ज नेहमी अपडेट ठेवा. स्क्रीन लॉक, फिंगरप्रिंट किंवा फेस लॉक वापरण्याची खात्री करा. वेळोवेळी अॅप्सच्या परवानग्या तपासत रहा आणि अनावश्यक अॅप्स डिलीट करा.