आरोपी म्हणतो जामीन द्या, वर्षभर फेसबुक वापरणार नाही

आरोपी म्हणतो जामीन द्या, वर्षभर फेसबुक वापरणार नाही
फेसबुकचे स्मार्टवॉच येणार

कन्याकुमारीचे रहिवासी असलेले आरोपी जबीन चार्ल्स यांनी जामीन द्या, मी फेसबुकपासून एक वर्ष दूर राहीन, असं प्रतिज्ञापत्र मद्रास हायकोर्टात दाखल केलं होतं.

अनिश बेंद्रे

|

Nov 06, 2019 | 12:21 PM

चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॉर्फ फोटो फेसबुकवर शेअर करणाऱ्या आरोपीला फेसबुकपासून एक वर्ष दूर राहावं लागणार आहे. कन्याकुमारीचे रहिवासी असलेले आरोपी जबीन चार्ल्स यांनी जामीन द्या, मी फेसबुकपासून एक वर्ष दूर राहीन (Social Media One Year Ban), असं प्रतिज्ञापत्र मद्रास हायकोर्टात दाखल केलं होतं.

तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यात राहणाऱ्या जबीन चार्ल्स यांनी एक महिन्यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो होता. पोस्ट पाहून भाजपचे पदाधिकारी नांजिल राजा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आणि प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं.

सेल्फीच्या नादात जोडपं विहिरीत पडलं, लग्नाच्या तोंडावर तरुणीचा मृत्यू

कन्याकुमारीमधील वाडसरी पोलिसांनी जबीन यांच्याविरोधात 11 ऑक्टोबरला कलम 5050 (2) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 27 ब नुसार गुन्हा दाखल केला. अंतरिम जामीन मिळवण्यासाठी जबीन चार्ल्स मद्रास हायकोर्टात गेले होते. आपण पुढचं एक वर्ष सोशल मीडियापासून दूर राहू, असं प्रतिज्ञापत्र त्यांनी कोर्टात सादर केलं.

जबीन सोशल मीडिया वापरताना आढळले, तर त्यांचा जामीन रद्द केला जाईल, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. सार्वजनिक मंचावर आपलं मत व्यक्त करणं गुन्हा नसल्याचा सुप्रीम कोर्टाच्या मताचा दाखलाही जबीन यांनी हायकोर्टात दिला. मात्र जबीन यांनी स्वतःहून ही पोस्ट डिलीट केली आणि पंतप्रधानांचा अवमान करणं योग्य नसल्याचंही मान्य केलं. जबीन यांनी तोंडी माफी मागितलीच, मात्र यापुढे जाऊन स्थानिक वृत्तपत्रात जाहीर माफीनामा प्रसिद्ध करण्याची तयारीही (Social Media One Year Ban) दर्शवली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें