AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियावर या ललना करतील घात, राहा चार हात लांब

Honey Trap | आता अर्ध्यांहून अधिक जग सोशल मीडियावर आले आहे. कोणत्या ना कोणत्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही असालच. पण सोशल मीडियाचा वापर करताना सावध राहणे आवश्यक आहे. सुंदर मुलींच्या फ्रेंड रिक्वेस्टला भुरळून जाऊ नका. तुम्हाला जाळ्यात अडकविण्यासाठीची तो पहिला हुकमी एक्का फेकण्यात येतो. नंतर हळूहळू हनी ट्रॅपमध्ये ती व्यक्ती अडकते.

सोशल मीडियावर या ललना करतील घात, राहा चार हात लांब
| Updated on: Dec 22, 2023 | 4:46 PM
Share

नवी दिल्ली | 22 डिसेंबर 2023 : सोशल मीडियावर आता अर्ध्यांहून अधिक जग दिवस रात्र काही ना काही करत असते. लाईक्स, कमेंट्स, पोस्ट असा खेळ सुरु असतो. या अभासी जगात अनेक अनोळखी लोक एकमेकांना भेटतात. पण सोशल मीडियावरील एक चूक महागात पडू शकते. सुंदर मुलीच्या रिक्वेस्टवर तर अनेकांना आकाश ठेंगणे होते. पण कदाचित येथूनच Honey Trap सुरु होते. हा सुंदर प्रवास पुढे मायाजालात अडकवतो. तिथे ब्लॅकमेलिंगला सुरुवात होते. अनेकांचे आयुष्य उद्धवस्त होते. तेव्हा सावज होण्याऐवजी सावध व्हा.

Cyber Dost ने केले अलर्ट

मायक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म X वर सरकारचे अधिकृत खाते Cyber Dost ने एक पोस्ट करुन युझर्सला अलर्ट केले आहे. सोशल मीडियावर हनी ट्रॅपपासून सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांनी समाज माध्यमावर कोणत्या चुका टाळाव्यात आणि कसे सतर्क राहावे याची माहिती दिली आहे. हनी ट्रॅपमध्ये कसे अडकविण्यात येते याची माहिती दिली आहे.

हनी ट्रॅप म्हणजे काय ?

हनी ट्रॅप एक मायाजाल आहे. याठिकाणी काही महिलांच्या मध्यस्थीने पुरुषांना फसविण्यात येते. महिला गोडीगुलाबीने पुरुषांना जाळ्यात ओढतात. त्यांचे व्हिडिओ, फोटो शेअर करुन, गप्पा द्वारे सावज ओढण्यात येते. त्यानंतर त्यांना फसविण्यात येते. ब्लॅकमेलिंग करण्यात येते. समाजात, नातेवाईकांमध्ये बदनाम करण्याची धमकी देत त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करण्यात येते.

समाज माध्यमावर करु नका ही चूक

  1. हनी ट्रॅपमध्ये अडकायचे नसेल तर चुकून पण सोशल मीडियावर या चुका करु नका
  2. सोशल मीडियावर कोणत्याही अनोळखी मुलीच्या जाळ्यात अडकू नका
  3. अनोळखी तरुणीशी चॅटिंग करु नका. ही फसवणुकीची सुरुवात असते
  4. अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करण्यापूर्वी त्या व्यक्तीची माहितीचा पडताळा घ्या
  5. सोशल मीडियावर चॅटिंग दरम्यान तरुणी रोमॅटिंक गप्पांमध्ये ओढत असेल तर सावध व्हा
  6. अशा खात्याची लागलीच तक्रार करा. प्रकरण हातबाहेर जाण्यापूर्वी पोलिसांची मदत घ्या
  7. समाज माध्यमावर अनोळखी तरुणीची रिक्वेस्ट स्वीकारु नका अथवा तुम्ही पण पाठवू नका
  8. जर एखादी अनोळखी तरुणी सोशल मीडियावर व्हिडिओ कॉल करत असेल तर तो कॉल उचलू नका
  9. व्हिडिओ कॉलवर रेकॉर्डिंग करुन ब्लॅकमेलिंगचा प्रकार सध्या सुरु आहे.
  10. सावध राहाल तर हनी ट्रॅप प्रकरणात अडकणार नाहीत
  11. पण मोहात अडकून फसलात तर सायबर क्राईम नॅशनल क्रमांक 1930 वर कॉल करा
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.