चिनी स्मार्टफोन निर्माता टेक्नो (Tecno) जास्त क्षमतेच्या बॅटरीसह एक नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे. या स्मार्टफोनचे प्रोमो ई-कॉमर्स साइट ॲमॅझोनवर (Amazon) लाइव्ह करण्यात आल्यामुळे आता टेक्नो आपला पुढचा स्मार्टफोन पोवा 3 (Pova 3) लाँच करेल अशी शक्यत व्यक्त होत आहे. या स्मार्टफोनमध्ये 7000mAh बॅटरी असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यापूर्वी अनेक ब्रँड्सचे स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसह आले आहेत परंतु Tecno Pova 3 ने या पुढची एक पायरी ओलांडली असून या पेक्षा जास्त क्षमतेची बॅटरी घेउन नवीन स्मार्टफोन दाखल होणार आहे. सहसा स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांकडून त्यांच्या मोठ्या स्क्रीन डिसप्ले आणि वापराच्या पद्धतीमुळे इतक्या मोठ्या बॅटरीसह पॅड लाँच केले जात असते. या लेखाच्या माध्यमातून Tecno Powa 3 बद्दल वैशिष्ट्ये आणि इतर स्पेसिफिकेशन्स (Specifications) जाणून घेणार आहोत.
ई-कॉमर्स साइटवर Tecno Pova 3 स्मार्टफोन लिस्ट होताच फोनसंबंधित अनेक फीचर्सची माहिती लिक झाली. रिपोर्टनुसार, Pova 3 मध्ये Helio G88 प्रोसेसर Mali G52 GPU सह दिला जाईल. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन Android 12 वर काम करण्याचे सांगण्यात आले आहे. हा स्मार्टफोन 128GB स्टोरेज आणि 6GB रॅमसह येईल. गरजेनुसार स्मार्टफोन 5GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम वाढवता येणार आहे.
डिसप्लेबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेल सेल्फी शूटरसाठी मध्यभागी पंच होलसह 90Hz च्या रीफ्रेश दरासह 6.9 इंचाचा फुलएचडी + एलसीडी डॉट इन डिसप्ले देण्यात येणार आहे. मागील बाजूस ग्राहकांना 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, ट्रिपल कॅमेरा मॉड्यूल मिळेल. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Tecno Pova 3 मध्ये साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर, स्टिरिओ स्पीकर दिले आहे. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 7,000 mAh ची बॅटरी दिली जाईल, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Tecno Pova 3 भारतात लाँच होणार असला तरी तो कोणत्या तारखेला लाँच होईल याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही. Amazon आणि Tecno ने देखील भारतातील लाँचिंगबद्दल कुठलीही तारीख सांगितलेली नाही. हा स्मार्टफोन लवकरच लाँच होण्याची अपेक्षा आहे.
परफॉर्मेंस – MediaTek Helio G90 डिसप्ले – 6.9 इंच (17.52 सेमी) स्टोरेज – 64 GB कॅमेरा – 48 MP + 2 MP + 2 MP + 2 MP बॅटरी – 7000 mAh भारतात किंमत – 14666 रॅम – 4 जीबी