AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अलाइव्ह मॅट्रिक्स डिस्प्लेसह भारतात लाँच झाला Tecno Pova 8 Pro 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

टेक्नो कंपनीने त्यांचा नवीन Tecno Pova 8 Pro 5G स्मार्टफोन भारतात या किमतीत लाँच केला आहे. यामध्ये 6,500mAh बॅटरी, 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 50-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. चला तर मग या फोनची ‍किंमत आणि फिचर्स आजच्या लेखात जाणून घेऊयात.

अलाइव्ह मॅट्रिक्स डिस्प्लेसह भारतात लाँच झाला Tecno Pova 8 Pro 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Tecno Pova 8 Pro 5GImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 26, 2026 | 4:27 PM
Share

भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. त्यातच तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण टेक्नोने सुद्धा भारतात त्यांचा पोवा 8 सिरीजमधील नवीन स्मार्टफोन Tecno Pova 8 Pro 5G सादर केला आहे. या फोनमध्ये तुम्हाला मोठी 6500mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग आणि 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. या फोनचे सर्वात मुख्य फिचर्स म्हणजे मागील बाजूस असलेला 177 मिनी-एलईडीसह अलाइव्ह मॅट्रिक्स डिस्प्ले, जो वेगवेगळ्या परिस्थितीत लाइट इफेक्ट्स दाखवतो. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 अल्टिमेट प्रोसेसर आणि 144Hz रिफ्रेश रेट असलेला AMOLED डिस्प्ले देखील आहे. तर आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि फिचर्स व उपलब्धता याबद्दल जाणूनध्‍ घेऊयात.

Tecno Pova 8 Pro 5G स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्ध

टेक्नो पोवा 8 प्रो 5G ची भारतात किंमत 49 हजार 999 रूपयांपासून सुरू होते. तसेच या फोन खरेदीवर कंपनी निवडक क्रेडिट, डेबिट आणि UPI व्यवहारांवर 3 हजार रूपयांचा इन्स्टंट कॅशबॅक देखील देत आहे. हा फोन 21 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच हा फोन आर्क व्हाइट, ग्राफाइट ब्लॅक आणि टुंड्रा ग्रीन या रंगांमध्ये उपलब्ध असेल.

डिस्प्ले आणि पॉवरफूल प्रोसेसर

पोवा 8 प्रो 5 जी मध्ये 1208x 2644 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट असलेला 6.78-इंचाचा हायपरलक्स AMOLED डिस्प्ले आहे. स्क्रीनची कमाल ब्राइटनेस 4500निट्स पर्यंत आहे

हा फोन 4nm तंत्रज्ञानावर आधारित ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 अल्टिमेट चिपसेटद्वारे समर्थित आहे, ज्याचा कमाल क्लॉक स्पीड 2.6GHz आहे.

यात टेक्नो पी1 ग्राफिक्स चिप आणि एआरएम माली-जी615 एमसी2 जीपीयू देखील आहे. तसेच यामध्ये कुलिंगसाठी व्हेपर चेंबर देखील देण्यात आला आहे.

हा फोन ड्युअल सिम सपोर्टसह येतो आणि अँड्रॉइड 16 वर आधारित HiOS 16 वर चालतो. कंपनीने दोन ओएस अपग्रेड आणि तीन वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सचे आश्वासन दिले आहे.

अलाइव्ह मॅट्रिक्स डिस्प्ले आणि कॅमेरा

फोनच्या मागील बाजूस 177 मिनी एलईडींनी बनलेला अलाइव्ह मॅट्रिक्स डिस्प्ले आहे. तसेच हा फोन विविध ‘ब्रीदिंग लाईट’ इफेक्ट्स तयार करू शकतो.

या फोनच्या कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून, त्याला 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड कॅमेऱ्याची जोड दिली आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

या फोनमध्ये 6500mAh क्षमतेची बॅटरी असून तो 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. Tecno Pova 8 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी, एनएफसी, जीपीएस, ग्लोनास, बेडू आणि गॅलिलिओ यांसारखे कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहेत.

सुरक्षेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक आहे. या फोनमध्ये अॅम्बियंट लाइट सेन्सर, प्रॉक्झिमिटी सेन्सर, ई-कम्पास आणि जायरोस्कोप देखील आहेत. याचे वजन अंदाजे 189 ग्रॅम आहे. कंपनीच्या मते हा फोन धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP69K रेटेड आहे.

Follow Us
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा