6000mAh बॅटरी, 11GB एक्सटेंडेड रॅमसह Tecno Pova Neo लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Tecno ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Tecno Pova Neo लाँच केला आहे. हा एक मिड रेंज मोबाईल आहे. या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 6000 mAh बॅटरी आणि 6.8 इंचांचा डिस्प्ले आहे.

6000mAh बॅटरी, 11GB एक्सटेंडेड रॅमसह Tecno Pova Neo लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Tecno Pova Neo
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 4:10 PM

मुंबई : Tecno ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Tecno Pova Neo लाँच केला आहे. हा एक मिड रेंज मोबाईल आहे. या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 6000 mAh बॅटरी आणि 6.8 इंचांचा डिस्प्ले आहे. यामध्ये 6 GB RAM देण्यात आला आहे. हा रॅम 11 GB पर्यंत एक्सटेंड करता येतो. कंपनीने यामध्ये फास्ट चार्जिंगचे फीचर्सही दिले आहेत. आकर्षक डिझाइन देण्यासाठी कंपनीने त्यात कर्व क्रेटर डिझाइन बॉडी वापरली आहे. हा स्मार्टफोन 22 जानेवारीपासून खरेदी करता येणार आहे.

या Tecno मोबाईलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 12999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यासोबत 1499 रुपये किमतीचे Tecno इयरबड्स देखील उपलब्ध असतील. तुम्ही हा फोन 22 जानेवारीपासून रिटेल स्टोअरमधून खरेदी करू शकाल. या स्मार्टफोनमध्ये 6 GB रॅम आहे. यासोबतच 5 GB पर्यंत एक्सपांडेबल रॅमचा पर्याय यात उपलब्ध आहे. यात 128 GB इंटर्नल स्टोरेजचा पर्याय आहे. यामध्ये 512 जीबीपर्यंतचे एसडी कार्ड अॅड केले जाऊ शकते. तसेच, हा फोन Android 11 आधारित HiOS v7.6 वर काम करतो.

Tecno Pova Neo चे स्पेसिफिकेशन्स आणि कॅमेरा

Tecno Pova Neo च्या फीचर्सबद्दल सांगायचे झाल्यास, यामध्ये 6.8 इंचाचा एचडी प्लस बिग डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 89.24 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो आहे. Tecno Pova Neo च्या कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. याला AI लेन्स देखील मिळते, ज्यामध्ये F2.0 चे अपर्चर आहे आणि याच्या मदतीने फोटो अधिक स्पष्ट दिसतात. या कॅमेरा सेटअपच्या मदतीने, स्लो मोशन व्हिडिओ आणि 1080 पिक्सेल टाइम लॅप्सचा वापर केला जाऊ शकतो, जे प्रो शूटिंग अनुभव वाढवण्यास मदत करतात.

Tecno Pova Neo मधील बॅटरी आणि इतर फीचर्स

Tecno Pova Neo मध्ये 6000 mAh ची बॅटरी उपलब्ध आहे, जी युजर्सना सिंगल चार्जवर उत्तम बॅटरी बॅकअप देण्यास मदत करते. कंपनीचा दावा आहे की यामध्ये 55 दिवसांचा स्टँडबाय बॅकअप मिळतो आणि 190 तासांचा म्युझिक प्लेबॅक टाइम मिळतो. TECNO चा हा मोबाईल MediaTek Helio G25 प्रोसेसरसह येतो, ज्यामध्ये ED इंजिन ऑप्टिमायझेशनचे फीचर्स उपलब्ध आहेत. यामध्ये स्मार्ट पॅनल 2.0, किड्स मोड आणि सोशल टर्बो सारखे पर्याय उपलब्ध आहेत.

इतर बातम्या

7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय

ट्रिपल रिअर कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 680 SoC प्रोसेसरसह Realme 9i भारतात लाँच, किंमत…

Motorola चा नवीन Tablet बाजारात, Realme Pad, Samsung Tablet ला टक्कर

(Tecno Pova Neo launched in India, know price and features)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.