भारतात शाओमी 17T पासून ते मोटोरोला एज 70 प्रो प्लस पर्यंत ‘हे’ 3 नवीन फोन जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार लाँच
जूनच्या पहिल्या आठवड्यात मोटोरोला, शाओमी, लावा या कंपनीचे स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहेत. तर हे पॉवरफूल स्मार्टफोन कोणत्या दिवशी कोणत्या फिचर्स लाँच होणार आहे ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत नवीन स्मार्टफोन सादर होणार आहे. लावा, मोटोरोला आणि शाओमी अशा ब्रँडेड कंपन्याचे फोन लाँच होणार आहेत. तर या नवीन स्मार्टफोन्सची वैशिष्ट्येही समोर आली आहेत, ज्यात उत्तम डिस्प्ले, मोठी बॅटरी, पॉवरफूल प्रोसेसर आणि कॅमेरा अपग्रेड्स यांचा समावेश आहे. तसेच हे स्मार्टफोन बजेट फ्रेंडली आणि प्रीमियम सेगमेंट मध्ये हे फोन उपलब्ध करण्यात येणार आहे.
तर ग्राहक हे स्मार्टफोन्स कंपनीच्या वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरून खरेदी करू शकतील. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात कोणते स्मार्टफोन लाँच होणार आहेत.
Motorola Edge 70 Pro+ भारतात लाँच होण्याची तारीख: हा आगामी फोन पुढील आठवड्यात 4 जून रोजी भारतात लाँच होणार आहे. लाँच झाल्यानंतर हा फोन कंपनीच्या वेबसाइटवर आणि फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Motorola Edge 70 Pro+ फिचर्स: फ्लिपकार्टवरील मायक्रोसाइटवरून असे दिसून येते की, या फोनमध्ये 50x पर्यंत एआय सुपर झूम, 50-मेगापिक्सलचा पेरिस्कोप लेन्स, मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 एक्सट्रीम प्रोसेसर, 6.8-इंचाचा AMOLED डिस्प्ले, 50-मेगापिक्सलचा सोनी LYTIA 710 सेन्सर, 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सक्षम सर्व लेन्स, व्हेपर कूलिंग चेंबर, गोरिला ग्लास 7i, 6500mAh बॅटरी, डॉल्बी अॅटमॉस आणि मोटो एआय फीचर्स आहेत.
Xiaomi 17T भारतात लाँच होण्याची तारीख: शाओमीचा हा आगामी फोन पुढील आठवड्यात 4 जून रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहे. कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त हा फोन ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.
Xiaomi 17T ची फिचर्स: ॲमेझॉनवरील एका मायक्रोसाइटवरून असे समोर आले आहे की, या फोनमध्ये 5X टेलीफोटो सेन्सर, 6500mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी, 67W हायपरचार्ज, मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर आणि लायका (LEICA) कॅमेरा सिस्टीम आहे.
Lava Bold N2 5G Specifications भारतात लाँच होण्याची तारीख: हा लावा फोन पुढील आठवड्यात 3 जून रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त हा फोन ॲमेझॉनवर देखील खरेदीसाठी उपलब्ध असेल.
लावा बोल्ड N2 5G चे फिचर्स: ॲमेझॉनच्या एका मायक्रोसाइटवरून असे दिसून येते की, हा फोन क्लीन अँड्रॉइड 16 चा अनुभव देईल, म्हणजेच त्यात ब्लोटवेअर ॲप्स नसतील. किंमतीच्या बाबतीत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये, मात्र लाँचच्या दिवशी या फोनची किंमती समोर येईल.