‘हे’ दोन स्मार्टफोन रेडमी टर्बो 5 ला देतात टक्कर, जाणून घ्या कोणता स्मार्टफोन आहे सर्वोत्तम

रेडमी टर्बो 5 भारतात लाँच झाला आहे. तर याच किमतीच्या रेंजमध्ये भारतीय बाजारपेठेत जवळपास त्याच किमतीत दोन फोन उपलब्ध असून, ते दमदार फीचर्स देतात. मात्र, प्रत्येक डिव्हाइसची स्वतःची अशी काही खास वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग, किंमत, कॅमेरा आणि बॅटरी अशा विविध बाबींमध्ये कोणता फोन रेडमी टर्बो 5 शी स्पर्धा करत आहे.

हे दोन स्मार्टफोन रेडमी टर्बो 5 ला देतात टक्कर, जाणून घ्या कोणता स्मार्टफोन आहे सर्वोत्तम
smartphone
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 17, 2026 | 9:26 PM

भारतीय बाजारपेठेत रेडमी टर्बो 5 हा स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. लाँच झाल्यानंतर भारतीय बाजारपेठेत मिड-रेंज स्मार्टफोन सेगमेंटमधील स्पर्धा अधिक रंजक झाली आहे. कारण 7,540mAh बॅटरी आणि डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा चिपसेटसह हा फोन मोटोरोला एज 70 प्रो आणि सॅमसंग गॅलेक्सी ए37 5जी या स्मार्टफोनला थेट टक्कर देत आहे. तर हे तिन्ही स्मार्टफोन जवळपास सारख्याच किंमतीच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. परंतु बॅटरी, कॅमेरा, डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर सपोर्टमध्ये अनेक महत्त्वाचे फरक आहेत. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या तिन्ही फोनमधील फरक जाणून घेणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. चला तर मग रेडमी टर्बो 5 शी स्पर्धा करणारे दोन स्मार्टफोन कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

किंमतीच्या बाबतीत कोणता स्मार्टफोन देतो चांगला मोबदला?

रेडमी टर्बो 5 च्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 37 हजार 999 रूपयांपासून सुरू होते, तर 12GB रॅम व्हेरिएंट 40 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध आहे.

दुसरीकडे मोटोरोला एज 70 प्रो चे 8GB + 256GB मॉडेल 38 हजार 999 रूपयांमध्ये आणि 12GB + 256GB मॉडेल 41 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलेक्सी A37 5G हा सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. कारण त्याच्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत 41 हजार 999 रूपयांपासून सुरू होते, तर 8GB + 256GB आणि 12GB + 256GB व्हेरिएंट अनुक्रमे 47 हजार 499 रूपये आणि 52 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध आहेत. तर किमतीच्या बाबतीत, रेडमी टर्बो 5 हा सर्वात स्वस्त पर्याय असल्याचे दिसते.

डिस्प्ले आणि सॉफ्टवेअरच्या बाबतीत कोणता फोन आहे उत्तम

रेडमी टर्बो 5 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 3500 निट्सच्या पीक ब्राइटनेससह 6.59-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले आहे.

तर मोटोरोला एज 70 प्रो मध्ये 144Hz रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट आणि 5,200 निट्सपर्यंतच्या ब्राइटनेससह 6.8-इंचाचा सुपर एचडी AMOLED डिस्प्ले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए37 5जी मध्ये 120Hz रिफ्रेश रेटच्या सपोर्टसह 6.7-इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED+ डिस्प्ले आहे.

सॉफ्टवेअर अपडेट्सच्या बाबतीत सॅमसंग सहा पिढ्यांच्या अँड्रॉइड आणि वन UI अपडेट्सचे आश्वासन देते, तर रेडमी चार वर्षांचे OS अपडेट्स आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देईल. मोटोरोला तीन वर्षांचे OS अपडेट्स देईल.

प्रोसेसर आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत कोण पुढे आहे?

रेडमी टर्बो 5 मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर असून, त्याला 12 जीबी LPDDR5x अल्ट्रा रॅम आणि 256 जीबी UFS 4.1 स्टोरेजची जोड आहे.

मोटोरोला एज 70 प्रो मध्ये सुद्धा डायमेन्सिटी 8500 एक्स्ट्रीम चिपसेट असून, त्याला LPDDR5x रॅम आणि UFS 4.1 स्टोरेजची जोड आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए37 5जी मध्ये कंपनीचा स्वतःचा एक्सिनोस 1480 प्रोसेसर आहे, जो 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.

हे तिन्ही फोन आधुनिक हार्डवेअरसह येतात, परंतु रेडमी आणि मोटोरोलाचे डायमेन्सिटी चिपसेट अधिक पॉवरफूल पर्याय म्हणून उत्तम आहेत.

बॅटरी आणि चार्जिंगच्या बाबतीत रेडमी ठरते उत्तम

बॅटरीच्या बाबतीत रेडमी टर्बो 5 आघाडीवर आहे. यात 7540mAh क्षमतेची मोठी बॅटरी असून ती 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 27W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

मोटोरोला एज 70 प्रो मध्ये 6,500mAh क्षमतेची बॅटरी असून ती 90W फास्ट चार्जिंग आणि ५W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

दुसरीकडे, सॅमसंग गॅलेक्सी ए37 5जी मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी असून ती 45W चार्जिंगला सपोर्ट करते. जर जास्त बॅटरी लाईफ आणि फास्ट चार्जिंगला तुम्ही प्राधान्य देत असाल, तर या तुलनेत रेडमी टर्बो 5 हा अधिक चांगला पर्याय असल्याचे दिसते.

तिन्ही फोनच्या कॅमेरा आणि डिझाइनमध्ये काय विशेष आहे?

फोटोग्राफीसाठी रेडमी टर्बो 5 मध्ये 50-मेगापिक्सलचा सोनी IMX882 प्रायमरी सेन्सर आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 20-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

तर मोटोरोला एज 70 प्रो मध्ये 50-मेगापिक्सलचा सोनी LYT-710 प्रायमरी सेन्सर, 50-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि एक अतिरिक्त सेन्सर आहे, तर समोरच्या बाजूला 50-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए37 5जी मध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 5-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे, तर सेल्फी कॅमेऱ्यात 12-मेगापिक्सलचा सेन्सर आहे.

कॅमेरा सेटअपच्या बाबतीत मोटोरोला हा सर्वात संतुलित पर्याय असल्याचे दिसते.

शेवटी कोणता फोन विकत घ्यावं?

मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग हे तुमचे सर्वोच्च प्राधान्य असेल, तर रेडमी टर्बो 5 हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. ज्यांना उत्तम डिस्प्ले, कॅमेरा आणि फीचर्स हवे आहेत, त्यांच्यासाठी मोटोरोला एज 70 प्रो हा एक प्रबळ दावेदार आहे. दुसरीकडे, ज्यांना दीर्घकालीन सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सुरक्षा सपोर्ट हवा आहे, त्यांच्यासाठी सॅमसंग गॅलेक्सी ए37 5जी हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे तिन्ही स्मार्टफोन्स वेगवेगळ्या गरजांसाठी डिझाइन केलेले आहेत आणि निवड पूर्णपणे तुमच्या प्राधान्यांवर अवलंबून असेल.

Follow Us