7000mAh बॅटरी पॉवरफूल डिस्प्ले आणि प्रोसेसरसह हा अप्रतिम फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
रियलमीचा नवीन 5G स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा नवीन फोन आकर्षक वैशिष्ट्यांसह बजेट सेगमेंटमध्ये ठेवण्यात आला आहे. याची विक्री कधी सुरू होईल आणि या फोनमध्ये कोणती वैशिष्ट्ये असतील, हे आजच्या लेखात सविस्तर जाणून घेऊयात.

15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन फोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी रियलमीने आकर्षक फिचर्स सह Realme Narzo 100 Lite 5G लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या प्रमुख फिचर्समध्ये मोठी 7000 mAh बॅटरी, 144Hz रिफ्रेश रेट आणि मीडियाटेक प्रोसेसर यांचा समावेश आहे. चला या फोनची किंमत, उपलब्धता आणि इतर प्रमुख फिचर्स जाणून घेऊयात.
Realme Narzo 100 Lite 5G ची भारतात किंमत
या नवीनतम 5G स्मार्टफोनची किंमत 4GB रॅम आणि 64GB व्हेरिएंटसाठी 13 हजार 499 रूपये आहे. तर 4GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटसाठी 14 हजार 499 रूपये आणि टॉप-एंड 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 16 हजार 499 रूपये आहे. लाँच ऑफरमध्ये 1 हजार 500 रूपयांपर्यंतच्या बँक कार्ड सवलतीचा समावेश आहे.
या फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 21 एप्रिल रोजी कंपनीच्या वेबसाइटवर आणि ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच हा फोन फ्रॉस्ट सिल्व्हर आणि थंडर ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. या किंमतीच्या रेंजमध्ये त्याची स्पर्धा मोटोरोला g35 5G, पोको M6 प्लस 5G, ओप्पो K14x 5G, आणि सॅमसंग गॅलेक्सी F06 5G सारख्या मॉडेल्सशी आहे.
Realme Narzo 100 Lite 5G फिचर्स
ओएस: अँड्रॉइड 16 वर आधारित असलेला हा हँडसेट रियलमी यूआय 7.0 सह येईल.
स्क्रीन: या रियलमी मोबाईलमध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 900 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेससह 6.8-इंचाचा डिस्प्ले आहे.
प्रोसेसर: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी Narzo 100 Lite मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये एअरफ्लो व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टीम आहे.
बॅटरी: बायपास चार्जिंग फीचर असलेल्या या फोनमध्ये 7000 mAh क्षमतेची बॅटरी आहे.
कॅमेरा सेटअप: Realme Narzo 100 Lite मध्ये मागील बाजूस 13-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, तर पुढील बाजूस 5-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये: हा नवीनतम स्मार्टफोन स्मार्ट टच 2.0 सह एआय (AI) वैशिष्ट्यांसह येतो. हा फोन पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP64 रेटिंगसह येतो.