AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smart Helmet! फक्त जीवच नाही तर पेट्रोलही वाचवणार

आशिष त्रिपाठी, विपिन और सुलेख या अशोका इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड मॅनेजमेंट वाराणसीमधील विद्यार्थ्यांनी या स्मार्ट ट्रॅफिक हेल्मेटचा शोध लावला आहे.

Smart Helmet! फक्त जीवच नाही तर पेट्रोलही वाचवणार
Smart helmet
| Updated on: Feb 13, 2021 | 11:13 PM
Share

वाराणसी : हेल्मेटचा आतापर्यंत एकच फायदा होता, रस्ते अपघात अपघातात सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर केला जात होता. परंतु आता असे एक नवीन हेल्मेट तयार करण्यात आलं आहे, जे बऱ्याच गोष्टी करण्यास सक्षम असेल. हे हेल्मेट अपघातापासून आपलं संरक्षण करेलच, सोबतच पेट्रोलची बचतही करेल. इतकेच नव्हे तर अपघातासारखी अनुचित घटना घडली तर याबाबतीत रुग्णवाहिका आणि पोलिसांना देखील कळवेल. एका खासगी महाविद्यालयाच्या बीटेकच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या हेल्मेटमुळे वाहतूक नियंत्रणही होईल. (this smart helmet can save people from accidents and also helps in saving petrol and traffic control)

आशिष त्रिपाठी, विपिन और सुलेख या अशोका इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड मॅनेजमेंट वाराणसीमधील विद्यार्थ्यांनी या स्मार्ट ट्रॅफिक हेल्मेटचा शोध लावला आहे. या हेल्मेटमुळे जेव्हा ट्रॅफिक सिग्नलची लाइट लाल (Red) होईल तेव्हा तुमची बाईक आपोआप थांबेल आणि सिग्नल ग्रीन (हिरवा) झाल्यावर बाईक आपोआप सुरु होईल. हे हेल्मेट ट्रॅफिक सिग्नलच्या 50 मीटर रेंजमध्ये येताच आपोआप अॅक्टिव्हेट होईल. या हेल्मेटमध्ये लावण्यात आलेले ट्रान्समीटर अपघात झाल्यास उपयुक्त ठरू शकतात.

संपूर्ण सिस्टम रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्समीटरवर चालते

हे हेल्मेट बनवणारा विद्यार्थी विपिनने सांगितले की, आमची संपूर्ण यंत्रणा रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्समीटरवर काम करते. या स्मार्ट हेल्मेट डिव्हाइसमध्ये 2 ट्रान्समीटर आणि एक रिसीव्हर आहे. रिसीव्हर आपल्या दुचाकीमध्ये बसवला जाईल. आमच्या हेल्मेटमध्ये 1 ट्रान्समीटर आहे, जो हेल्मेट घातल्यानंतर आपोआप सक्रीय (अॅक्टिव्हेट) होईल.

वाहनामधील रिसीव्हर चालू झाल्यानंतर आणि आपण हेल्मेट घातल्यानंतर दुचाकी सुरु होते. दुसरा ट्रान्समीटर सिग्नल यंत्रणेजवळ बसवलेला असेल, जेव्हा आपले वाहन रेड लाईट असलेल्या सिग्नलवरील ट्रान्समीटरच्या संपर्कात येईल, त्यावेळी रेड सिग्नलमध्ये बसवण्यात आलेला ट्रान्समीटर आपली बाईक बंद करतो. जेव्हा सिग्नल ग्रीन होईल तेव्हा आपली बाईक आपोआप सुरु होईल. रेड सिग्नल ट्रान्समीटरची रेंज सध्या 50 मीटरपर्यंत आहे, जी आणखी वाढविली जाऊ शकते.

अपघातानंतरही हे हेल्मेट तुमचे रक्षण करेल असे विपिनने सांगितले. सेंसरच्या माध्यमातून अपघाताच्या ठिकाणाचं लोकेशन पोलीस, रुग्णवाहिका आणि तुमच्या कुटूंबियांपर्यंत पोहोचवण्यास हे हेल्मेट सक्षम आहे. सिग्नलवर बाईक बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोलची बचत होईल.

हेही वाचा

व्हॅलेंटाईनआधी शाओमीने या वस्तूची किंमत केली कमी, आता 3 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार ही वस्तू

एकदा चार्ज केल्यास 40 तास चालणार, Boat Rockerz 255 Pro+ चं भारतात लाँचिंग, किंमत फक्त…

अ‍ॅपल वॉचला टक्कर देणार फेसबुकचे स्मार्टवॉच, पुढील वर्षी स्मार्टवॉच बाजारात आणण्याची फेसबुकची योजना

(this smart helmet can save people from accidents and also helps in saving petrol and traffic control

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.