AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Instagram Tips: लेआऊट फीचरद्वारे एकाच वेळी शेअर करा खूप फोटो, दूर होईल टेन्शन

युजर्स इन्स्टाग्राम वर एकापेक्षा जास्त फोटो एकाच इमेजमध्ये घेऊ शकतात. इन्स्टाग्रामच्या या फीचरमुळे, एकाहून अधिक फोटोज सिंगल इमेजमध्ये घेता येतात. तुम्हीही एक-एक फोट सिलेक्ट करून दमला असाल, तर हे फीचर तुमच्यासाठी उत्तम ठरेल.

Instagram Tips: लेआऊट फीचरद्वारे एकाच वेळी शेअर करा खूप फोटो, दूर होईल टेन्शन
| Updated on: Aug 22, 2022 | 2:27 PM
Share

मुंबईः इन्स्टाग्राम हे एक फोटो शेअरिंग (Instagram App) ॲप आहे आणि याचे कोट्यावधी युजर्स इथे रोज भरपूर फोटोज (users share many photos) शेअर करत असतात. मात्र पोस्टमध्ये एकापेक्षा अधिक फोटो शेअर करायचे असल्यास प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी युजर्सना अनेक फोटोजचे कोलाज (photo collage) बनवून मगच ते शेअर करता येतात. मात्र आता असे करावे लागणार नाही, एका नव्या फीचरमुळे (New feature Layout) एका सिंगल इमेजमध्येच एकाहून अधिक फोटो शेअर करता येणे शक्य होणार आहे. इन्स्टाग्रामने एक नवे फीचर आणले असून, त्यामुळे अनेक फोटोज एकाच इमेजमध्ये बसवण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यासाठी युजर्स इन्स्टाग्रामच्या लेआऊट फीचरचा वापर करू शकतात, ज्यामध्ये एका इमेजमध्येच खूप फोटो फिट करणे शक्य आहे. इन्स्टाग्रामचे हे नवे फीचर कसे काम करते, हे जाणून घेऊया.

इन्स्टाग्रामचे लेआऊट ॲप

इन्स्टाग्रामचे लेआऊट फीचर हे गुगल प्ले स्टोअर वर स्वतंत्र ॲप म्हणूनही उपलब्ध आहे. युजर्सना हवे असल्यास ते हे ॲप डाऊनलोड करूनही लेआऊट फीचरचा लाभ घेऊ शकतात. लेआऊट ॲप उघडल्यानंतर तुम्ही कॅमेरा रोलमधून काही फोटोज सिलेक्ट केल्यास, आपोआप कस्टम लेआऊट प्रिव्ह्यू दिसू लागेल. इन्स्टाग्रामने या ॲपमध्ये Face ऑप्शन दिला आहे. या ऑप्शनमध्ये तुमच्या कॅमेरा रोलमधील सर्व फोटो दाखवले जातात, ज्यामध्ये विविध व्यक्ती दिसत आहेत.

असा बनवा लेआऊट

लेआऊट ॲपमध्ये तुम्ही सहजपणे फोटो निवडू शकता आणि ड्रॅग ॲंड ड्रॉप करू शकता. युजर्स त्यांच्या आवडीनुसार, फोटो मोठा करू शकतात अथवा लेआऊटध्ये फोटो फिट करण्यासाठी त्याची साईझही बदलू शकतात. मिरर सारखे इफेक्ट देण्यासाठी तुम्ही फोटो फ्लिप करू शकता किंवा तो रोटेटही होऊ शकतो.

इन्स्टाग्राम वर सिंगल फोटो तयार करण्याची पद्धत

जर तुम्हाला लेआऊट ॲप वापरायचे नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही इन्स्टाग्रामवरूनही हे काम करू शकता. इन्स्टाग्राममधील लेआऊट फीचरचा लाभ घ्यायचा असेल, तर खाली दिलेली पद्धत वापरून पहा .

– तुमच इन्स्टाग्राम अकाऊंट उघडा.

– वरील बाजूस असलेल्या Create New या पर्यायवर टॅप करा किंवा फीड वर कुठेही सरळ स्वाईप करा.

– त्यानंतर खालील बाजूस असलेल्या Story वर क्लिक करा.

– तेथे डावीकेडे Layout वर टॅप करा.

– खाली जाऊन कॅमेऱ्यामधून जे हवे असतील ते फोटो घ्या किंवा गॅलरीमधून फोटोज निवडा. फोटोंचा लेआऊट बदलण्यासाठी Change grid पर्यायावर टॅप करा.

– त्यानंतर खाली टॅप करावे आणि नंतर तळाशी डाव्या बाजूला Your Story पर्यायावर टॅप करून तुमची Story शेअर करावी.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.