मोबाईल बिलासाठी TRAI चा मोठा निर्णय, जास्तीचं बिल टाळण्यासाठी बदलले नियम

मोबाईल बिलासाठी TRAI चा मोठा निर्णय, जास्तीचं बिल टाळण्यासाठी बदलले नियम
व्हॉट्सअ‍ॅपने बऱ्याच वेळा या नवीन स्टोरेज मॅनेजमेंट टूलची चाचणी केली आहे. काही बीटा वापरकर्ते आधीपासूनच या सुविधेचा लाभ घेत होते.

डिफॉल्ट पद्धतीने मोबाईल रोमिंग अॅक्टिव्ह न करण्यावर TRAI ने दूरसंचार ऑपरेटर्सलासूचना देत हा नियम अनिवार्य केला आहे

भीमराव गवळी

|

Oct 01, 2020 | 3:57 PM

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने बुधवारी आतंरराष्ट्रीय मोबाईल रोमिंगसाठी (International Roaming Services) नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहे. डिफॉल्ट पद्धतीने आंतरराष्ट्रीय मोबाईल रोमिंग अॅक्टिव्ह न करण्यावर TRAI ने दूरसंचार ऑपरेटर्सला (Telecom Companies) सूचना देत हा नियम अनिवार्य केला आहे. वापरकर्त्यांच्या मागणीनुसारच नियमामध्ये बदल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. जर ग्राहकाने संबंधित सर्व्हिस अॅक्टिव्हेट केली तर त्यांच्या विनंतीनंतरच ही सर्व्हिस बंद केली जाऊ शकते. या नोटिफेकेशनच्या 30 दिवसांच्या आत या नियमांना लागू करणं आवश्यक आहे. TRAI ने मे महिन्यात याबद्दल कंसलटेशन पेपर जारी केला होता. (TRAI changes the rule of roaming billing Mobile Phone)

ग्राहकांना सूचित करणं महत्त्वाचं TRAI च्या नियमानुसार, आंतरराष्ट्रीय मोबाईल रोमिंग अॅक्टिव्हेट होताच दूरसंचार कंपनीला याची माहिती ग्राहकांना देणं महत्त्वाचं आहे. SMS, E-MAIL किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून ते ग्राहकांना याबद्दल माहिती द्यावी लागेल. यामध्ये लागू झालेल्या शुल्काबद्दल ग्राहकांना सूचित करावं लागेल. खरंतर, या नियमांमुळे ग्राहकांना बिलाचा मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे कोणत्याही नवीन सेवा सुरू करण्याआधी संबंधीत दूरसंचार कंपनीशी तुमच्या सेवांविषयी बोलून घ्या. ज्याने वाढीव बिलाचा धोका टळू शकतो. जर तुम्ही मोबाईलचं Postpaid कनेक्शन वापरत असाल तर तुम्हाला तुमच्या बिलासंबंधी सतर्क राहणं महत्त्वाचं आहे, असं TRAI नं म्हटलं आहे.

बिलाच्या धक्क्यापासून वाचण्यासाठी असे आहे नवे नियम Roaming charge संबंधी कोणताही निर्णय न घ्यावा यासंबंधी रिलायन्स जियो, एअरटेल, वोडाफोन या कंपनींनी TRAI शी चर्चा केली आहे. पण जर या नियमाला सर्व दूरसंचार कंपन्यांसाठी अनिवार्य केलं तर बिलाच्या धक्क्यापासून वाचण्यासाठी आतंरराष्ट्रीय मोबाईल रोमिंगवर काही नवे नियम जारी करण्यात आले आहेत. याआधी जियोने फ्लाइट्समध्ये कनेक्टिव्हिटी देण्यासंदर्भात निर्णय दिला होता.

संबंधित बातम्या : Online Mobile Banking | ‘डिजिटल फ्रॉड’पासून वाचण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ सोप्या टिप्स!

TRAI changes the rule of roaming billing Mobile Phone

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें