तुमचा फोन पावसात भिजला तर… घाबरू नका ‘या’ पद्धती ताबडतोब अवलंबा
पावसाळ्याच्या दिवसात फोन पाण्यात पडला किंवा पावसात भिजला तर घाबरू नका. योग्य वेळी योग्य पावले उचलून तुम्ही तुमचा स्मार्टफोन वाचवू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण या काही टिप्सच्या मदतीने तुमचा फोन पुन्हा चालू करू शकतात.

पावसाळा सुरू झाला आहे, तर या दिवसांमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात स्मार्टफोन ओला होणे किंवा पाण्यात पडल्याने खराब होऊ शकतो. तुम्ही जर कामानिमित्त सतत बाहेर प्रवास करत असाल तर अशावेळेस फोनची विशेष काळजी घ्यावी. पण आता पावसात फोन ओला झाला तरी घाबरून जाण्याची गरज नाही. जर तुम्ही जलद आणि योग्यरित्या ट्रिक्सचा वापर केला तर तुमचे डिव्हाइस वाचवता येते. चला तर मग आजच्या या लेखात आपण तुमचा फोन ओला झाल्यास तुम्हाला कोणत्या ट्रिक्सचा अवलंब करावा लागेल ते जाणून घेऊयात…
1. पहिली गोष्ट म्हणजे फोन ताबडतोब बंद करणे. फोन अजूनही काम करत आहे की नाही हे तपासण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा कायमचे नुकसान होऊ शकते. जर फोन चालू असेल तर पॉवर बटण पूर्णपणे बंद होईपर्यंत दाबा आणि धरून ठेवा.
2. स्मार्टफोन बंद झाल्यावर यामधील सिम कार्ड, मायक्रोएसडी कार्ड आणि जर बॅटरी काढता येत असेल तर ती देखील काढून टाका. यामुळे हवा आत जाऊ शकते आणि शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो. जर फोनमध्ये कव्हर असेल तर ते देखील काढून टाका.
3. आता फोनचा बाहेरचा भाग हलक्या हाताने कोरडा करा. फोनमधील पाणी पुसण्यासाठी स्वच्छ आणि लिंट-फ्री कापड किंवा पेपर टॉवेल वापरा. पूर्णपणे स्वच्छ करा. यात फोन मधील पाणी काढण्यासाठी जोरजोरात झटकवू नका कारण यामुळे पाणी आणखी पसरू शकते. हेअर ड्रायर यामुळे फोनच्या आतील भाग खराब होऊ शकतात.
4. सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे फोनच्या आतील भाग सुकवणे. तर यासाठी तांदूळामध्ये फोन अजिबात ठेऊ नका कारण काही प्रमाणात तांदूळ ओलावा शोषून घेऊ शकतो, परंतु जर त्याचा स्टार्च पोर्ट्समध्ये गेला तर तो खराब करू शकतो. एक चांगला पर्याय म्हणजे सिलिका जेल पॅकेट्स. हे छोटे पॅकेट्स, जे बहुतेकदा नवीन शूज किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह येतात, ते ओलावा शोषून घेण्यासाठी डिझाइन केलेले असतात. तुमचा फोन सिलिका पॅकेट्ससह हवाबंद कंटेनर किंवा झिपलॉक बॅगमध्ये ठेवा.
जर तुमच्याकडे सिलिका जेल नसेल, तर फोनला हवेशीर ठिकाणी ठेवा जिथे हवा चांगली प्रवाहित असेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तो पंख्यासमोर देखील ठेवू शकता परंतु थेट उष्णता टाळा. फोन अशा स्थितीत ठेवा की पोर्टमधून पाणी बाहेर पडू शकेल.
5. फोन कमीत कमी 48 ते 72 तास तसाच सुकण्यास ठेवा. जर तुम्ही तो लवकर चालू करण्याचा प्रयत्न केला तर कायमचे नुकसान होण्याचा धोका वाढेल.
6. बराच वेळ सुकल्यानंतरही फोन चालू करून पहा. जर तो चालू झाला नाही, तर तो काही वेळ चार्जरशी कनेक्ट करा. जर तो अजूनही चालू झाला नाही किंवा स्क्रीन ब्लिंक करणे किंवा आवाजाच्या समस्या तर फोन एका चांगल्या दुरुस्ती दुकानात घेऊन जा जिथे फोन पूर्णपणे सुकविण्यासाठी आणि खराब झालेले भाग तपासण्यासाठी विशेष उपकरणे वापरली जाऊ शकतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
