तुमचं Twitter Account अधिक सुरक्षित होणार, ट्विटरकडून नवं फीचर सादर

ट्विटरने (Twitter) जाहीर केले आहे की त्यांचे युजर्स लवकरच सिक्युरिटी कीजचा (Security Key) वापर करु शकतील.

तुमचं Twitter Account अधिक सुरक्षित होणार, ट्विटरकडून नवं फीचर सादर
Twitter
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 1:00 PM

मुंबई : ट्विटरने (Twitter) जाहीर केले आहे की त्यांचे युजर्स लवकरच सिक्युरिटी कीजचा (Security Key) वापर करु शकतील, तथापि, हे केवळ सर्टिफिकेशन मेथड म्हणून शक्य होईल. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने म्हटले आहे की, युजर्स आता केवळ एकच नाही तर बर्‍याच सिक्युरिटी कीजचा वापर करु शकतील. (Twitter Security key can be used as an authentication method)

सध्या, ट्विटर युजर्स साइन इन करण्यासाठी फक्त एक सिक्युरिटी की वापरू शकतात. तसेच दुसरी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन पद्धत म्हणून एक ऑथेंटिकेटर अ‍ॅप किंवा एसएमएस कोड आवश्यक आहे. कंपनीने ट्वीट करून म्हटले आहे की, “अनेक सिक्युरिटी की वापरुन तुम्ही तुमचं ट्विटर अकाऊंट अधिक सुरक्षित ठेवू शकता. आता तुम्ही मोबाईल आणि वेब दोन्हीवर एकापेक्षा अधिक सुरक्षा की वापरून लॉग इन करू शकता. ”

सुरक्षा की काय आहे?

सिक्युरिटी किंवा सुरक्षा कीज या फिजिकल कीज असतात, ज्या यूएसबी किंवा ब्ल्यूटूथच्या मदतीने कनेक्ट केलेल्या असतात. ऑनलाइन सोशल मीडिया अकाऊंट्सचे संरक्षण करण्यासाठी त्या अधिक सुरक्षित मार्गाने तयार केल्या आहेत. टू-फॅक्टर सर्टिफिकेशन म्हणजे ट्विटर अकाऊंट्ससाठी सिक्युरिटी की ही एक एक्स्ट्रा लेअर आहे.

ट्विटर नवीन फीचर्स लाँच करणार

आता ट्विटरदेखील फेसबुक ग्रुपसारखे फीचर घेऊन येणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हे फीचर लाँच झाल्यानंतर ट्विटरवरील युजर्स एखाद्या विषयासह एक ग्रुप तयार करू शकतात किंवा प्रत्येकाला आवडेल असाच कॉन्टेंट त्यामध्ये पोस्ट करू शकतील. हे फीचर फेसबुकसारखेच असेल. म्हणजे, जर तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये एखाद्या चित्रपटाविषयी बोलायचे असेल तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये तुमचं मत मांडू शकता आणि इतर युजर्सना ती वाचता-पाहता येतील.

दरम्यान, ट्विटर सध्या सेफ्टी मोडवरही काम करत आहे, जर कोणतेही ट्विट हानिकारक असल्याचे सिद्ध झाले तर ट्विटर ते त्वरित हटवेल किंवा संबंधित व्यक्तीचे अकाऊंट ब्लॉक करेल.

इतर बातम्या

स्टेटस पाहिलंय की नाही हे समोरच्याला समजणार नाही; WhatsApp ची भन्नाट ट्रिक

सावधान! गुगल क्रोमच्या Incognito मोडमध्येही तुमचा डेटा ट्रॅक होतो, कंपनीवर 3600 कोटींचा खटला

WhatsApp मध्ये लवकरच जबरदस्त नवे फिचर्स; मल्टी डिव्हाईस सपोर्टसह Instagram Reels लुटता येणार आनंद!

(Twitter Security key can be used as an authentication method)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.