WhatsApp मध्ये लवकरच जबरदस्त नवे फिचर्स; मल्टी डिव्हाईस सपोर्टसह Instagram Reels लुटता येणार आनंद!

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार आता व्हॉ्ट्सअ‌ॅपमध्ये आणखी काही बदल केले जाणार आहेत. अ‌ॅण्ड्रॉईड आणि iOS ऑपरेटीगं सिस्टीमवर हे अपडेटेड फिचर्स उपलब्ध असतील. (whats app new features)

WhatsApp मध्ये लवकरच जबरदस्त नवे फिचर्स; मल्टी डिव्हाईस सपोर्टसह Instagram Reels लुटता येणार आनंद!
whats app new features
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 12:36 AM

मुंबई : WhatsApp हे असे माध्यम आहे, ज्याच्या उपयोगामुळे आपले जीवन अगदी सुकर झाले. एका क्षणात आपण जगातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. युजर्सना मेसेजिंग सहज आणि सोपे व्हावे यासाठी व्हॉट्सअ‌ॅप प्रत्येक वेळी काहीतरी नव्या गोष्टी घेऊन येतं. व्हॉ्ट्सअ‌ॅपच्या प्रत्येक अपडेटेड व्हर्जनध्ये एखादंतरी धमाकेदार फिचर असतं, ज्याच्या वापरामुळे गोष्टी अगदची सोप्या होतात. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार आता व्हॉ्ट्सअ‌ॅपमध्ये आणखी काही बदल केले जाणार आहेत. अ‌ॅण्ड्रॉईड आणि iOS ऑपरेटीगं सिस्टीमवर हे अपडेटेड फिचर्स उपलब्ध असतील. ज्यामध्ये मल्टी-डिव्हाईस सपोर्ट, आर्काईव्ह चॅट्स, इन्क्रिप्डेड बॅकअप अशा काही गोष्टींचा समावेश आहे. (whats app will launch the new features including disappearing messages encrypted chat)

व्हॉ्ट्सअ‌ॅप आपले कोणतेही अपडेटेड व्हर्जन अ‌ॅण्ड्रॉईड आणि iOS ऑपरेटीगं सिस्टीमच्या बीटा व्हर्जनसाठी रोलआऊट करते. त्यानंतर यशस्वी चाचणी नंतर हे नवे फिचर्स सामान्य जनतेसाठी वापरण्यास उपलब्ध करुन दिले जातात. तर जाणून घेऊयात, व्हॉटस्पअ‌ॅच्या नव्या व्हर्जनमध्ये काय काय असणार?

Multi Device Support

सध्या पाहिलं तर व्हॉ्ट्सअ‌ॅप वेब किंवा डेस्कटॉपच्या मदतीने आपल्याला व्हॉ‌ट्सअ‌ॅप दुसऱ्या डिव्हाईसवर वापरायचे असेल तर त्यासाठी मूळ डिव्हाईसवर ईंटरनेट अ‌ॅक्टिव्ह असणे गरजेचे आहे. मात्र, अपडेटेड व्हर्जनमध्ये व्हॉ्ट्सअ‌ॅप वेगवेगळ्या डिव्हाईसवर वारण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये मूळ डिव्हाईवर ईंटरनेटची सुविधा नसली तरी Multi Device Support फिचर वापरता येईल.

Archived चॅट फिचर

व्हॉट्सअॅपच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये आर्काईव्ह चॅट फिचर उपलब्ध असेल. आर्काईव्ड केलेली चॅटींग कायमस्वरुपी आर्काईव्ह म्हणून जपून ठेवली जाईल. व्हॉट्सअॅपतर्फे हे फिचर Vacation Mode किंवा Read Later या नावाने बाजारात आणले जाईल, अशा चर्चा होत्या. मात्र, त्यानंतर आर्काईव्ह चॅट फिचरच्या नावात कोणताही बदल केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

चॅट बॅकअपसुद्धा Encrypted असणार

सध्याच्या व्हॉ्ट्सअ‌ॅपमध्ये बॅकअप घेतलेल्या चॅट्स या Encrypted नसतात. मात्र, सुरक्षेचा मुद्दा समोर ठेवून आता व्हॉट्सअ‌ॅपतर्फे बॅकअप केलेले चॅटींग पासवर्ड प्रोटेक्टेड असेल, असे सांगितले जात आहे. हे फिचर जर सत्यात उतरले तर बॅकअप केलेली चॅटींग ही दुसरं कोणीही वाचू शकणार नाही.

आता व्हॉट्सअ‌ॅपवरसुद्धा Instagram Reels

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार व्हॉ्ट्सअ‌ॅपच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये इन्स्टाग्रामधील रिल्सचा सपोर्ट मिळू शकतो. या नव्या फिचरनंतर व्हॉट्सअ‌ॅप युजर्स इन्स्टाग्रामधील रिल्ससारख्या शॉर्ट व्हिडीओचा आंनद लुटू शकतील.

24 तासांत मेसेज गायब होणार

सध्या व्हॉ्ट्सअ‌ॅपवर Disappearing मेसेजचे फीचर आहे. मात्र, या फिचरच्या माध्यमातून कोणताही मेसेच डिलीट होण्यास 7 दिवसांचा वेळ लागतो. 7 दिवसानंतर चॅटींगमधील मेसेज आपोआप डिलीट होतात. मात्र, कंपनीकडून 24 तासांच्या आत मेसेज Disappear होण्यासाठी नवे फिचर लॉन्च विचार सुरु आहे. या नव्या फिचरच्या मदतीने 24 तासांच्या आत मेसेज डिलीट होतील.

इतर बातम्या :

यूट्यूबर असाल तर सावधान ! यूट्यूबकडून तब्बल 30 हजार व्हिडओ डिलीट, कारण काय?

Axis Bank ची कोट्यवधी ग्राहकांसाठी जबरदस्त सुविधा; ‘या’ उपकरणाद्वारे झटपट पैशांचे व्यवहार होणार

YouTube द्वारे पैसे कमवणाऱ्यांना झटका, आता कमाईमधले ‘इतके’ पैसे टॅक्स म्हणून भरावे लागणार

(whats app will launch the new features including disappearing messages encrypted chat)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.