AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp वर कुठला ऑफर आला असेल तर सावधान, महिला दिनाला फसणुकीसाठी फेक लिंक व्हायरल

International women's day 2021 वर अनेक कंपन्या महिलांसाठी आकर्षक ऑफर देत आहेत (Fake Link Viral On WhatsApp).

WhatsApp वर कुठला ऑफर आला असेल तर सावधान, महिला दिनाला फसणुकीसाठी फेक लिंक व्हायरल
WhatsApp fake link
| Updated on: Mar 08, 2021 | 1:05 PM
Share

मुंबई : International women’s day 2021 वर अनेक कंपन्या महिलांसाठी आकर्षक ऑफर देत आहेत (Fake Link Viral On WhatsApp). पण, या ऑफर्सच्या चक्करमध्ये तुमची फसवणूकही होऊ शकते. WhatsApp वर मेसेजच्या माध्यमातून ऑफरचा लोभ देऊन महिलांच्या फसवणुकीचे अनेक प्रयत्न होत आहेत. WhatsApp वर एक मेसेज सर्क्युलेट होत आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, महिला दिनाला मोफत शूज दिले जातील आणि तेही एका मोठ्या ब्रांडचे (Fake Link Viral On WhatsApp Saying Adidas Offer Of Giving Free Shoes On International Women’s Day).

जर तुम्हालाही अशा प्रकारचा कुठला मेसेज आला असेल तर याला लगेच डिलीट करा. कारण, हा एक फेक मेसेज आहे. याच्या माध्यमातून तुमच्या खात्यातील पैसे लुटले जाऊ शकतात. तसेच, तुमची खाजगी माहितीही याद्वारे हॅक केली जाऊ शकते.

याप्रकारची लिंक येत आहे

WhatsApp वर दररोज हजारो मेसेज फॉरवर्ड केले जातात आणि काही लोक यावर विश्वासही ठेवतात. कुठल्या अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने अनेकदा युझरची फसवणूक होते. जागतिक महिला दिवसाला WhatsApp वर जो मेसेज पाठवला जात आहे त्यामध्ये दावा केला जात आहे की जोड्यांची मोठी कंपनी महिला दिवसावर महिलांना मोफतमध्ये शूज देत आहे. त्यामध्ये एक लिंकही आहे. याप्रकराची ती लिंक आहे – https://v-app.buzz/adidass/tb.php?_t=161492973315:35:33”. जर तुमच्याकडेही ही लिंक आली असेल तर लगेच ही लिंक डिलीट करा. या लिंकच्या माध्यमातून तुमची पर्सनल डिटेल चोरली जाऊ शकतात.

वेबसाईटवर कुठलाही ऑफर नाही

एडिडासच्या वेबसाईटवर अशा प्रकारची कुठलीही ऑफर नाही. जर कंपनी असा कुठला ऑफर युझर्सला देते तर ती आपल्या अधिकृत वेबसाईटवरही अपडेट करेल. अनेक कंपन्या आपल्या आधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरही याबाबत माहिती देतात. सोबतच लोकांना पाठवण्यात येणारी लिंकही संशयास्पद आहे. यूआरएलला अशा प्रकारे आहे – v-app.buzz/adidass.

यामध्ये एडिडासची स्पेलिंग चुकीची आहे. याचं स्पेलिंग Adidas आहे. कंपनीच्या वेबसाईटचं यूआरएल https://shop.adidas.co.in/ आहे. सोबतच या मेसेजमध्ये जो लोगो देण्यात आला आहे तो Adidas चा नाहीये. त्यामुळे तुम्ही या लिंकवर विश्वास नाही ठेवू शकत.

Fake Link Viral On WhatsApp Saying Adidas Offer Of Giving Free Shoes On International Women’s Day

संबंधित बातम्या :

…अन्यथा तुम्ही WhatsApp मेसेज, कॉल्स करु शकणार नाही, WhatsApp ची युजर्सना ताकीद

ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, किंमत 9 हजारांहून कमी, Realme चा दमदार स्मार्टफोन लाँच

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.