पुराव्याशिवाय आधारमधील पत्ता बदलण्यासाठी काय कराल?

पुराव्याशिवाय आधारमधील पत्ता बदलण्यासाठी काय कराल?
सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे.


मुंबई : भारतात आता ‘आधार’ कार्ड केवळ ओळखपत्र राहिले नसून एक महत्त्वाचे कागदपत्र झाले आहे. याचा अनेक सरकारी योजनांमध्ये कागदपत्र म्हणून वापर होतो. अनेक महत्वाच्या आर्थिक आणि इतर व्यवहारांसाठी आधार आवश्यक आहे. मात्र अनेकदा अशा कागदपत्रांमधील माहिती अद्ययावत करणे जिकिरीचे काम ठरते. यावर उपाय म्हणून आधार कार्ड तयार करणाऱ्या UIDAI ने एक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार कोणत्याही रहिवासी पुराव्याशिवायच तुम्हाला आपला पत्ता बदलता येणार आहे.

UIDAI ने आधारमधील आपला पत्ता अद्ययावत करण्यासाठी दिलेल्या या सुविधेनुसार केवळ 30 दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे नागरिकांचा महिनाभर थांबण्याचा त्रास कमी होणार आहे. तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की असा कोणताही अधिकृत पुरावा न देता आपला पत्ता कसा बदलणार? मात्र UIDAI ने यावर एक नामी उपाय शोधला आहे. आपल्या कुटुंबातील एका सदस्याच्या पत्त्याचा उपयोग करुन तुम्हाला तुम्हाला पत्त्यात बदल करता येणार आहे. तसेच त्यासाठी वैधता प्रमाणपत्रही मिळवता येणार आहे.

त्यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार वैधता पत्र तयार करण्यासाठी अर्ज करावा लागेल. आधार वैधतेला सहमती मिळाल्यानंतर 30 दिवसांमध्ये पत्ता वैधता पत्र आणि त्याचा गुप्त सांकेतिक क्रमांक (सीक्रेट कोड) संबंधित अर्जदाराच्या पत्त्यावर पाठवला जाईल.

वैधता पत्र तयार करण्याच्या विनंतीनंतर पत्ता अद्ययावत करण्याच्या परवानगीसाठी एक लिंक आणि SMS पाठवला जाईल. दिलेल्या लिंकवर क्लिक करुन परवानगी देण्यासाठी OTP पाठवला जाईल. त्यानंतर तुम्हाला सीक्रेट कोड येईल. हा कोड UIDAI च्या वेबसाईटवर ‘प्रोसीड टू अपडेट अॅड्रेस’ या लिंकवर टाकायचा आहे. त्यानंतर पत्ता बदल करण्याची तुमची विनंती मान्य केली जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचे ई-आधार ऑनलाईनही डाऊनलोड करता येईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI