नववर्षापूर्वी ‘या’ गाड्या लॉन्च होणार; किंमत, फिचर्स नक्की घ्या जाणून

Upcoming Cars: तुम्हाला नवीन कार घ्यायची आहे का? कोणती कार घ्यावी हे समजत नाहीये का? मग चिंता करून नका या वर्षाखेर काही नवीन गाड्या बाजारात येणार आहेत, त्यांची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.

नववर्षापूर्वी ‘या’ गाड्या लॉन्च होणार; किंमत, फिचर्स नक्की घ्या जाणून
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 3:51 PM

तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही थोडं थांबू शकता. हे वर्ष संपण्यापूर्वी बाजारात नवीन कार एन्ट्री घेणार आहेत. या कारमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक फीचर्स मिळत आहेत. यात नवीन तंत्रज्ञानासह फीचर्स पाहायला मिळतील.2024 हे वर्ष संपणार आहे, पण बाजारात नेहमीच नवनवीन कार येत असतात. नवं वर्ष येण्याआधीच यंदा अनेक कार बाजारात येणार आहेत. यात होंडा, टोयोटा, किआ आणि स्कोडा सारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. बाजारात लॉन्च होणाऱ्या सर्व गाड्यांची माहिती जाणून घेऊया.

2024 Honda Amaze कधी लॉन्च होणार?

नवी Honda Amaze खरेदी करायची असेल तर आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. नवीन Honda Amaze 4 डिसेंबर 2024 रोजी बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. नवीन Honda Amaze पूर्णपणे नवीन डिझाईनसह येऊ शकते. ही बेबी होंडा सिटीसारखी दिसण्याची शक्यता आहे.या कारमध्ये तुम्हाला 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि रियर पार्किंग कॅमेरा इत्यादी मिळू शकतात.

Skoda Kylaq कधी लॉन्च होणार?

Skoda Kylaq आपल्याला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहायला मिळू शकते. कंपनीने याची सुरुवातीची किंमत यापूर्वीच जाहीर केली आहे, याची एक्स शोरूम किंमत 7.89 लाख रुपये आहे. सध्या कंपनीने सर्व व्हेरियंटच्या किंमती जाहीर केल्या नाहीत. येत्या 2 डिसेंबरला या कारच्या किंमती जाहीर करण्यात येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

Skoda Kylaq यात 1 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे, जे 115 पीएस पॉवर जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसह जोडले गेले आहे.

Kia Syros कधी लॉन्च होणार?

Kia Syros भारतात 19 डिसेंबरला लॉन्च होऊ शकते. आगामी Kia Syros कारमध्ये तुम्हाला सोनेटसारखा इंजिनचा पर्याय पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 83 पीएसपॉवर जनरेट करणारे 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन येण्याची शक्यता आहे. याशिवाय 120 पीएसपॉवर जनरेट करणारे 1 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 116 पीएस पॉवरचे 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळू शकते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.