AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smartwatch वर वापरा की WhatsApp; विना फोन करा चॅटिंग, वापरली का कधी ही ट्रिक

Smartwatch WhatsApp : लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वापर तर स्मार्टफोनधारक करतो. आता युझर्स सहजपणे त्यांच्या स्मार्टवॉचवर व्हॉट्सॲप डाऊनलोड करु शकतात. विना फोन त्यावर चॅटिंग करु शकतात.. काय आहे ट्रिक...

Smartwatch वर वापरा की WhatsApp; विना फोन करा चॅटिंग, वापरली का कधी ही ट्रिक
Smartwatch WhatsApp
| Updated on: Jun 15, 2024 | 5:09 PM
Share

WhatsApp चा वापर आता स्मार्टवॉचवर पण करता येतो. युझर्सला Wear OS हा एक चागंला पर्याय समोर आला आहे. अनेक युझर्सला आतापर्यंत माहिती नव्हते की, ते त्यांच्या स्मार्टवॉचवर व्हॉट्सॲप इन्स्टॉल करु शकतात. डाऊनलोड करु शकतात. विना फोन चॅटिंग करु शकतात. तुम्ही काही सोप्या पद्धतींचा वापर करुन, स्टेप्स फॉलो करुन तुमच्या स्मार्टवॉचवर व्हॉट्सॲपचा वापर करु शकता.

डायलरचा होणार उपयोग

व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर विकसीत होत आहे. हे फीचर युझरला त्यांच्या व्हॉट्सॲप डायलरच्या माध्यमातून व्हाईस कॉलची सुविधा देणार आहे. हे नवीन फीचर अजून पर्यंत Google Play बीटा प्रोगामवर वापरकर्त्यांसाठी देण्यात आलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, हे फीचर त्या युझर्सला एकदम उपयोगी पडेल, ज्यांच्याकडे समोरील व्यक्तीचा क्रमांक सेव्ह नसेल. त्याला केवळ डायलरवरुन संबंधिताचा मोबाईल क्रमांक डायल करुन व्हॉट्सॲप कॉल करता येईल.

व्हॉट्सॲपवर लवकरच AI फीचर 

जगभरात आत एआयचा बोलबाला सुरु आहे. व्हॉट्सअपवर त्याचा वापर होणार आहे. Meta लवकरच AI क्लबमध्ये सहभागी होईल. AI च्या Llama मॉडलचा वापर करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता टूलचा वापर युझर्स त्यांच्या  प्रश्नांना उत्तर मिळवू शकतील. एआय फीचरमुळे युझर्सला स्वतंत्र एआय ॲपची गरज राहणार नाही. युझर्सला एका क्लिकवर AI Access मिळणार आहे. WABetaInfo नुसार लवकरच iOS आणि Android बीटावर हे फीचर दिसेल. Meta AI फीचर व्हॉट्सॲपमध्ये सर्वात टॉपवर दिसेल.

स्टेप 1 : तुमची स्मार्टवॉच फोनसोबत कनेक्ट करा

तुमच्या Android फोनवर Googl Play Store उघडा

Wear Os हे ॲप सर्च करा आणि ते इन्स्टॉल करा

आता हे ॲप उघडा. आता तुमच्या स्मार्टवॉचसोबत फोन कनेक्ट करण्यासाठी ऑन-स्क्रीन निर्देशांचे पालन करा. कााही कंपन्या वॉचसाठी डेडिकेटेड ॲप प्ले स्टोअरवर देतात.

स्टेप 2 : स्मार्टवॉचमध्ये व्हॉट्सॲप इन्स्टॉल करा

तुमच्या Wear OS स्मार्टवॉचवर Google Play Store उघडा

आता व्हॉट्सॲप सर्च करा आणि इन्स्टॉल करा. जर तुम्हाला हे ॲप दिसत नसेल तर मग स्मार्टवॉच त्यासाठी सक्षम नसल्याचे समोर येते.

स्टेप 3 : स्मार्टवॉचवर व्हॉट्सॲप सेटअप करा

तुमच्या स्मार्टवॉचवर व्हॉट्सॲप उघडा

तुम्हाला स्मार्टवॉच स्क्रीनवर एक 8 अंकांचा कोड दिसेल

तुमच्या Android फोनवर व्हॉट्सॲप उघडा

तुम्हाला आता एक नोटिफिकेशन दिसेल. त्यात तुम्हाला नवीन डिव्हाईस खात्याशी जोडायचे आहे का? असा संदेश दिसेल.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!