AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त मजेसाठी Snapchat वापरताय? आता अशा पद्धतीने वापरा आणि घरबसल्या पैसे कमवा

आता Snapchat म्हणजे फक्त टाइमपास किंवा गंमत नाही, तर तुमच्या क्रिएटिव्हिटीला दाखवून पैसे कमवण्याची एक संधीसुद्धा आहे! होय, 'Spotlight' नावाच्या फीचरमागे आहे कमाई करण्याची संधी! चला, जाणून घेऊया स्नॅपचॅटवरून पैसे कसे मिळवायचे आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीला कमाईचा मार्ग कसा द्यायचा!

फक्त मजेसाठी Snapchat वापरताय? आता अशा पद्धतीने वापरा आणि घरबसल्या पैसे कमवा
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 30, 2025 | 10:07 PM
Share

Snapchat म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर लगेच मजेशीर Filters, स्ट्रीक्सची स्पर्धा आणि मित्रांना पाठवले जाणारे Snaps हेच चित्र उभं राहतं. पण आता Snapchat फक्त मजा करण्याचं अ‍ॅप राहिलेलं नाही, तर इथे तुम्ही चक्क पैसेही कमवू शकता! हो, अगदी Instagram Reels किंवा Facebook Video प्रमाणेच!

Spotlight: कमाईचा नवा ‘Snap’ प्लॅटफॉर्म!

Snapchat वर पैसे कमावण्याची खरी संधी दडलीय ‘Spotlight’ या फिचरमध्ये. साधारणपणे आपण Snaps फक्त मित्रांसोबत शेअर करतो, पण Spotlight हे एक सार्वजनिक स्टेज आहे जिथे तुमचा फोटो किंवा व्हिडीओ जगभरातील कोणालाही दिसू शकतो! जर तुमचा कंटेंट व्हायरल झाला, त्याला प्रचंड लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले, तर Snapchat तुमच्या मेहनतीला आर्थिक बक्षीस देतं.

Crystals: व्हर्च्युअल रिवॉर्ड्स जे खऱ्या पैशात बदलतात!

तुमच्या Spotlight कंटेंटवर येणाऱ्या लोकप्रियतेवर आधारित Snapchat तुम्हाला ‘Crystals’ नावाचं बक्षीस देतं. हे Crystals म्हणजे डिजिटल पॉईंट्स असतात, जे नंतर खऱ्या पैशांमध्ये रूपांतर करता येतात. जितका जास्त व्हायरल कंटेंट, तितके जास्त Crystals, आणि अर्थात तितकी जास्त कमाई!

पैसे मिळवण्यासाठी काय करायला हवं?

सोपंय, पण थोडं स्मार्टली करावं लागतं. तुमचा व्हिडीओ Spotlight वर अपलोड केला पाहिजे, तो ओरिजिनल, आकर्षक आणि Snapchat च्या नियमांमध्ये बसणारा असणं आवश्यक आहे. जर तो ट्रेंडिंगमध्ये गेला तर My Profile मध्ये ‘Snap Crystals’ नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला कळेल की तुम्ही पात्र ठरलात का.

काही महत्वाचे नियम लक्षात ठेवा!

1. तुमचा व्हिडीओ डिलीट केल्यास त्या व्हिडीओवरची कमाई तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही.

2. कंटेंट नेहमी Community Guidelines नुसार असावा.

3. एक व्हिडीओ अपलोड केल्यानंतर तो २८ दिवसांपर्यंत कमाईसाठी पात्र राहतो. जर या काळात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, तर तुम्ही पुन्हा पुन्हा रिवॉर्ड्स मिळवू शकता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.