9020mAh बॅटरी असलेला Vivo T5 Pro 5G फोन भारतात लाँच, नथिंग-रिअलमी सारख्या स्मार्टफोनला देणार टक्कर

Vivo T5 Pro 5G भारतात लाँच झाला आहे. हा 9020mAh बॅटरी, 144Hz AMOLED डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असलेला सर्वात पातळ स्मार्टफोन आहे. चला या फोनची किंमत आणि उपलब्ध ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.

9020mAh बॅटरी असलेला Vivo T5 Pro 5G फोन भारतात लाँच, नथिंग-रिअलमी सारख्या स्मार्टफोनला देणार टक्कर
Vivo T5 Pro 5G
Image Credit source: Vivo T5 Pro 5G
| Edited By: | Updated on: Apr 16, 2026 | 6:58 AM

विवो कंपनीने भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांसाठी मिड-रेंज सेगमेंटमध्ये नवीन Vivo T5 Pro 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या नवीनतम विवो स्मार्टफोनमध्ये 9020 mAh क्षमतेची मोठी बॅटरी असून हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात पातळ स्मार्टफोन आहे. याव्यतिरिक्त या हँडसेटमध्ये 144 Hz AMOLED डिस्प्ले, 1600 nits पीक ब्राइटनेस आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. चला तर मग या फोनची किंमत, उपलब्धता आणि यात असलेल्या खास वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊयात.

भारतातील Vivo T5 Pro 5G ची किंमत

फोनच्या 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 29 हजार 999 रूपये आहे. तर यातील 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 33 हजार 999 रूपये, आणि 12GB रॅम व 256GB असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 39 हजार 999 रूपये आहे. उपलब्धतेनुसार हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसोबतच फ्लिपकार्टवर 21 एप्रिल रोजी विक्रीसाठी उपलब्ध होईल. स्पर्धेच्या बाबतीत हा फोन नथिंग फोन (4a), गूगल पिक्सल 9A, मोटोरोला एज 60 प्रो, रियलमी GT 7, ओप्पो K13 टर्बो प्रो 5G, आणि पोको F7 5G यांसारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.

लाँच ऑफरमध्ये हा फोन तुम्ही ॲक्सिस, एचडीएफसी आणि एसबीआय कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 3 हजार रूपयांची त्वरित सूट, किंवा तुमचा जुना फोन एक्सचेंज करून 3 हजार रूपयांचा एक्सचेंज बोनस देण्यात येईल. एवढेच नाहीतर ग्राहकांना सहा महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांचाही लाभ मिळेल.

विवो टी5 प्रो 5G वैशिष्ट्ये

स्क्रीन: या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 5000 nits पीक ब्राइटनेस सपोर्टसह 6.83-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले आहे.

चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये Snapdragon 7s Gen 4 ऑक्टा कोअर प्रोसेसरसोबत ॲड्रेनो 810 जीपीयू वापरण्यात आला आहे.

ओएस: हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित OriginOS 6 वर चालतो.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 90 W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली पॉवरफूल 9020 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस सोनी IMX882 सेन्सर असलेला 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि त्यासोबत 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. मागील आणि पुढील दोन्ही कॅमेरे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहेत.

Follow Us