AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50MP कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

आपल्या एक्स - सीरिजचा विस्तार करण्यासाठी, जागतिक स्मार्टफोन ब्रँड Vivo ने चीनी ग्राहकांसाठी X 70, X 70 Pro आणि X 70 Pro Plus हे तीन नवीन फोन लॉन्च केले आहेत.

50MP कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 12:10 AM
Share

मुंबई : आपल्या एक्स – सीरिजचा विस्तार करण्यासाठी, जागतिक स्मार्टफोन ब्रँड Vivo ने चीनी ग्राहकांसाठी X 70, X 70 Pro आणि X 70 Pro Plus हे तीन नवीन फोन लॉन्च केले आहेत. GSM Arena नुसार, Vivo X70 आणि X70 Pro हे बऱ्यापैकी सारखेच आहेत, फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्यांमध्ये थोडा फरक आहे. दोन्ही स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंच AMOLED डिस्प्लेसोबत येतात. X70 प्रो Exynos 1080 प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे, तर Vivo X70 स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 सह येतो. (Vivo X 70 Series launched with 50MP camera and bigger display)

Vivo X70 च्या मागील बाजूस ट्रिपल शूटर कॅमेरा आहे. 40 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्संलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा 2X ऑप्टिकल झूमसह मिळेल. दरम्यान, Vivo X70 Pro 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड आणि 2X टेलिफोटो कॅमेरा पॅक ऑफर करतो. यात 8 मेगापिक्सेल सेन्सरसह चौथा कॅमेरा आणि 5 एक्स ऑप्टिकल झूमसह पेरिस्कोप लेन्स आहे. फोन कस्टम Vivo V1 ISP सह देखील येतो, जो फोकसिंग स्पीड आणि इमेज क्वालिटी वाढवू शकतो.

X 70Pro Plus 6.78 इंच सॅमसंग E5 AMOLED पॅनेलवर (6.56-इंचांपेक्षा जास्त) स्विच करतो आणि HDR सपोर्ट कायम आहे. हा नवीन डिस्प्ले एलटीपीओ पॅनेलचा वापर करतो, याचा अर्थ असा की तो हळूहळू त्याचा रिफ्रेश रेट 1 हर्ट्झ ते 120 हर्ट्झच्या श्रेणीमध्ये अॅडजस्ट करू शकतो. Vivo X70 चा टच सॅम्पलिंग रेट 300 Hz इतका आहे. E5 पॅनेल जुन्या A4 पॅनेलपेक्षा 25 टक्के कमी वीज वापरते.

फोनची व्हॅनिला आवृत्ती व्हाईट, ब्लॅक आणि नेबुला ग्रेडियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. त्याची किंमत 3,699 चीनी युआन पासून सुरू होते. प्रो आवृत्तीची किमत 4,299 चीनी युआनपासून सुरू होते. Vivo X70 Pro Plus बेस मॉडेलसाठी 5,500 चीनी युआनपासून सुरू होईल. सध्या हे फोन भारतात लॉन्च झालेले नाहीत.

इतर बातम्या

Jio Phone next: जिओच्या स्मार्टफोन लाँचिंगचा गणेश चतुर्थीचा मुहूर्त हुकला, ‘या’ कारणामुळे लाँचिंग लांबणीवर

 त्वरा करा! आयफोन 13 लाँच होण्यापूर्वी, आयफोन 12 वर हजारो रुपयांची सूट, काही तासांसाठीच आहे ऑफर

अवघ्या 6,999 रुपयात दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा असलेला स्मार्टफोन बाजारात

(Vivo X 70 Series launched with 50MP camera and bigger display)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.