अखेर Twitter नमलं, नवे तक्रार अधिकारी नेमणार, दिल्ली हायकोर्टात माहिती

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 04, 2021 | 11:12 PM

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) लवकरच तक्रार अधिकारी नियुक्त करणार आहे. याबाबत कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयाला माहिती दिली आहे.

अखेर Twitter नमलं, नवे तक्रार अधिकारी नेमणार, दिल्ली हायकोर्टात माहिती
Twitter

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) लवकरच तक्रार अधिकारी नियुक्त करणार आहे. याबाबत माहिती देताना कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, कंपनी तक्रार अधिकारी नेमण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. (we are in final stage to appoint Resident Grievance Officer; twitter inform to delhi high court)

यापूर्वी, भारतात नियुक्त केलेल्या अंतरिम तक्रार अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. खरं तर, नव्या आयटी नियमांनुसार भारतीय युजर्सच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांमध्ये तक्रार अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ट्विटरने धर्मेंद्र चतूर यांना अंतरिम तक्रार अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. तथापि, 21 जून रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर ट्विटरने म्हटले आहे की, कंपनी नवीन तक्रार अधिकारी नियुक्त करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

जेरेमी केसल नवे तक्रार अधिकारी

मीडिया रिपोर्टनुसार ट्विटर कंपनीचे वैश्विक कायदेशीर धोरण संचालक आणि अमेरिकन नागरिक जेरेमी केसल यांना भारतात तक्रार अधिकारी म्हणून नियुक्त करणार आहे. तथापि, नव्या नियमांनुसार या पदावर केवळ भारतीय नागरिकाची नेमणूक करणे गरजेचे आहे.

चतूर यांनी अशा वेळी राजीनामा दिला होता, जेव्हा ट्विटरवर सोशल मीडियाच्या नव्या नियमांवरून सरकारचा हल्ला सुरु होता. ट्विटरने हे नवीन नियम जाणीवपूर्वक न पाळल्याची टीका सरकारने केली आहे.

Google आणि Facebook देखील नमलं

दरम्यान, गुगल (Google) आणि फेसबुक (Facebook) सारख्या बड्या डिजिटल कंपन्यांनी भारतातील नवीन सोशल मीडिया नियमांनुसार (Social Media Rules तक्रार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासह इतर माहिती सार्वजनिक करण्याच्या उद्देशाने आपली वेबसाइट अद्ययावत (अपडेट) करणे सुरू केले आहे.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या (WhatsApp) बड्या सोशल मीडिया कंपन्यांनी नवीन डिजिटल नियमांनुसार माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे (आयटी) विविध तपशील शेअर केले आहेत. तथापि, ट्विटर अद्याप नियमांचे पालन करीत नाही. नवीन नियमांनुसार बड्या सोशल मीडिया मध्यस्थांना तक्रार निवारण अधिकारी, नोडल अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. या अधिकाऱ्यांची नियुक्ती भारतात होणे आवश्यक आहे आणि ते येथेच थांबून कामकाज सांभाळतील.

प्रमुख सोशल मीडिया मध्यस्थांच्या श्रेणीत त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांची युजर्स संख्या 50 लाखाहून अधिक आहे. उद्योग सूत्रांनी सांगितले की, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपने यापूर्वीच इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडे अनुपालन अहवाल शेअर केले आहेत. या नव्या मंचांवर नवीन तक्रार अधिकाऱ्यांच्या नेमणुकीची माहिती अद्ययावत केली जात आहे.

गुगल, यूट्यूबने तक्रार निवारण अधिकाऱ्यांविषयी माहिती दिली

गुगलने ‘कांटेक्ट अस’ पेजवर जो ग्रिअरचे नाव दिले आहे. त्याचा पत्ता माउंटन व्ह्यू अमेरिकेचा आहे. या पृष्ठावरील यूट्यूबसाठी तक्रार निवारण यंत्रणेविषयीदेखील माहिती प्रदान केली गेली आहे. नियमांनुसार, सर्व सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर, अ‍ॅप किंवा त्या दोन्हीवर तक्रार निवारण अधिकारी आणि त्यांचा पत्ता द्यावा लागतो. तसेच तक्रारीची पद्धत सांगावी लागेल ज्याद्वारे वापरकर्ता किंवा पीडित आपली तक्रार करू शकतात.

इतर बातम्या

Google Photos युजर्स आणि YouTube क्रिएटर्ससाठी वाईट बातमी, ‘या’ सर्व्हिसेस बंद होणार

फेसबुक प्रमाणेच MeWe, Diaspora यासह बरेच सोशल मीडिया पर्याय उपलब्ध, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

(we are in final stage to appoint Resident Grievance Officer; twitter inform to delhi high court)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI