iPhone,iPad आणि iMac मधील ‘i’ शब्दाचा अर्थ काय ? Apple वापरणाऱ्यांनाही माहिती नाही

तुम्ही जर आयफोन वापरत असाल तर आयफोन या इंग्रजी अक्षरातील 'आय' या इंग्रजी अक्षराचा अर्थ काय आहे. याचे सर्चिंग इंटरनेटवर नेहमी केले जात असते. तुम्हाला जर याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

iPhone,iPad आणि iMac मधील 'i'  शब्दाचा अर्थ काय ? Apple वापरणाऱ्यांनाही माहिती नाही
आयफोनसाठी मुलाने केला स्वतःच्या अपहरणाचा बनावImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 8:29 AM

मुंबई : Apple चे फोन वापरणे म्हणजे स्टेटस सिम्बॉल बनले आहे. आपल्या आकर्षक डिझाईन, अत्याधुनिक सॉफ्टवेअरमुळे आणि सातत्याने दर मॉडलेगणिक होणारे इनोव्हेशन यामुळे आयफोन इतर मोबाईल फोन पेक्षा वेगळा म्हणून ओळखला जातो.टेक्नोलॉजीच्या बाबतीत एप्पल कंपनीची उत्पादने चार पावले पुढेच असतात. मात्र ती खरेदी करताना खिसाही तेवढाच खाली करावा लागतो. परंतू तुम्ही कधी विचार केला आहे का की आयफोनच्या प्रोडक्ट्सची नावे ‘i’ पासून का सुरू होतात ? कारण आयफोन वापरणाऱ्यांनाही हे इंगित माहिती नाहीय त्यामुळे इंटरनेटवर हे सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या गोष्टीमध्ये समाविष्ट आहे.

अनेक जणांना वाटत असेल की आयफोन या इंग्रजी अक्षरांतील आय या इंग्रजी आद्याक्षराचा अर्थ इंटेलिजंट असावा, कारण एप्पलच्या iMac, iPhone, iPod, iPad सारख्या इंटरनेट आधारीत स्मार्ट डीव्हाईसच्या नावाची सुरूवात आय या इंग्रजी अल्फाबेट्सने होते. जर तु्म्हाला याचे गुपित माहीती नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की iPhone ते iPod पर्यंत Apple च्या प्रोडक्टचे नाव ‘i’ ने का सुरु होते आणि त्याचा अर्थ काय?

तुम्हाला आर्श्चय वाटेल की अॅपलच्या उत्पादनांचा ‘i’ या अक्षराचा एकच अर्थ दर्शविला जात नाही तर रीडर्स डायजेस्टच्या अहवालानुसार, त्याचे एकूण पाच अर्थ निघत आहेत. हे पाच अर्थ काय आहेत हे ही जाणून घेऊया. हे पाच अर्थ आहेत ‘इंटरनेट, इंडव्युजवल, इंस्ट्रक्शन, इन्फॉर्मेशन आणि इन्स्पायर असे त्याचे अर्थ असल्याचा रीडर्स डायजेस्ट म्हणते.

भारतात 2008 मध्ये आयफोन लाँच झाला तेव्हा केवळ पन्नास हजार लोकांनी तो विकत घेतला होता. 2022 अखेर सात दशलक्ष ( 70 लाख )  आयफोनचे स्मार्टफोन युनिट्स विक्री भारतात झाली असल्याचे म्हटले जाते.

2014 मध्ये कंपनीच्या नेतृत्वात बदल झाला. 2014 मध्ये Apple चे तत्कालीन सीईओ टिम कुक यांनी Apple Watch सादर केले, तेव्हा कंपनीने उत्पादनांच्या नावातून ‘i’ काढून टाकण्यास सुरुवात केली आणि नंतर Apple ने AirPods, नंतर AirTags सारख्या नावांसह उत्पादने लाँच केली.

आयफोनचे जनक म्हटले जाणारे  स्टीव्ह जॉब्स म्हणाले एकदा होते की ‘I’ म्हणजे ‘इंटरनेट, इंडव्युजवल, इंस्ट्रक्शन, इन्फॉर्मेशन आणि इन्स्पायर. त्यांनी ‘आय’ या आद्याक्षराचे पर्सनल प्रोनाऊन्स तसेच शिक्षणाच्या उद्देशाने ‘इन्स्ट्रक्शन’च्या रूपात संदर्भ देण्यासाठी केल्याचाही संकेतही दिला होता. अधिकृत अर्थ नाही.

वास्तविक असा ठराविक काही अर्थ नाही..

स्टीव्ह जॉब्स यांनी जोर देत म्हटले की तांत्रिकदृष्ट्या पाहीले तर असा काही त्याचा ठराविक अर्थ गृहीत धरला नव्हता. एप्पल कंपनीच्या कर्मचारी आणि ग्राहकांना कंपनीची मुल्ये आणि सिद्धांत शिकविण्यासाठी मुळात आग्रह धरला. कंपनीचे कर्मचारी आणि ग्राहकांना कंपनीची मूल्ये आणि तत्त्वे शिकवण्यासाठी हे केवळ एक ‘सर्वनाम’ आणि इन्स्ट्रक्शन होते असे त्यांनी नमूद केले होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.