नाव बदलल्यानंतर Facebook युजर्ससाठी नेमकं काय बदलेल? जाणून घ्या झुकेरबर्ग काय म्हणाले?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Oct 29, 2021 | 5:42 PM

फेसबुकचं नाव बदलल्यानंतर आता युजर्ससाठी काय बदल होतील? असा सवाल अनेकांना पडला आहे. मात्र जर तुम्ही Facebook वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी काहीही बदलणार नाही, असे स्वतः कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितलं आहे.

नाव बदलल्यानंतर Facebook युजर्ससाठी नेमकं काय बदलेल? जाणून घ्या झुकेरबर्ग काय म्हणाले?
Meta

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ असे केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक नवीन नावाने रिब्रँड करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर फेसबुकने कंपनीचं नाव बदललं आहे. पण असं असलं तरी फेसबुकच्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावे कायम राहणार आहेत. (What exactly will change for Facebook users after the name change? know what Zuckerberg said)

कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनीपासून “मेटाव्हर्स कंपनी” बनणार आहे आणि “एम्बेडेड इंटरनेट” वर काम करेल, जे वास्तविक आणि आभासी जग एकत्र करेल, असे फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे.

फेसबुकचं नाव बदलल्यानंतर आता युजर्ससाठी काय बदल होतील? असा सवाल अनेकांना पडला आहे. मात्र जर तुम्ही Facebook वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी काहीही बदलणार नाही, असे स्वतः कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितलं आहे. इन्स्टाग्राम वापरकर्त्यांसाठी आणि व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठीही हेच आहे. ते वापरत असलेल्या वेबसाइट आणि अॅप्स त्यांची जुनी नावे कायम ठेवली जातील.

नवीन नावाची घोषणा करताना झुकेरबर्ग म्हणाले, “आज आमच्याकडे सोशल मीडिया कंपनी म्हणून पाहिले जाते, परंतु आमच्या डीएनएमध्ये आम्ही एक अशी कंपनी आहोत जी लोकांना जोडण्यासाठी तंत्रज्ञान तयार करते आणि Metaverse हा सोशल मीडियाचा पुढचा टप्पा आहे.

फेसबुकचे नाव बदलल्याने सोशल मीडिया अॅप युजर्ससाठी बदलणार की नाही असे अनेक प्रश्न निर्माण होतात. याचे उत्तर नाही असेच आहे. झुकेरबर्ग यांनी मेटाची घोषणा केल्यानंतरही फेसबुक आपल्या वापरकर्त्यांसाठी पूर्वीप्रमाणेच राहील. अॅप वापरण्याच्या पद्धतीत कोणताही बदल होणार नाही. कोणतेही नवीन फीचर्स किंवा लेआउटची घोषणा केलेली नाही. फेसबुकचा वापर आणि मार्गदर्शक तत्त्वे तशीच राहतील.

2005 ला ही कंपनीने नाव बदललं होतं

फेसबुकचे माजी सिविक इंटिग्रिटी चीफ समिध चक्रवर्ती यांनी कंपनीला ‘मेटा’ हे नाव सुचवले होते. यापूर्वी फेसबुकने 2005 मध्ये असेच काही केले होते, जेव्हा त्याने आपले नाव TheFacebook वरून Facebook असे बदलले होते. जगभरात 3 अब्जाहून अधिक लोक फेसबुक वापरतात. त्याचवेळी, भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 41 कोटी आहे.

फेसबुक आणि इतर मोठ्या कंपन्यांसाठी ‘मेटाव्हर्स’ ही संकल्पना उत्साहवर्धक आहे कारण ती नवीन बाजारपेठा, नवीन प्रकारचे सोशल नेटवर्क्स, नवीन ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि नवीन पेटंटसाठी संधी निर्माण करेल, अशा मार्केटमध्ये आशा आहेत.

कंपनीने नाव जाहीर करताना मेटाव्हर्सची नेमकी काय असेल आणि ती प्रत्यक्षात कशी आणली जाईल याची योजना देखील सगळ्यांसमोर मांडली आहे. मेटाव्हर्स हे एक पूर्णतः ऑनलाईन विश्व असेल ज्या ठिकाणी व्हर्च्युअल वातावरणात आपल्याला ऑनलाईन गेम्स खेळता येऊ शकतील, काम करता येऊ शकेल त्याच बरोबर संभाषण देखील साधता येईल.

ऑनलाइन सुरक्षिततेबाबत अनेक देशांमध्ये कंपनीवर प्रश्न उपस्थित होत असताना, प्रक्षोभक मजकूर थांबत नसताना फेसबुकने हे नाव बदलले आहे. भारत सरकारने फेसबुकला पत्र लिहून सोशल मीडिया कंपनीद्वारे वापरल्या जाणार्‍या अल्गोरिदम आणि प्रक्रियांचा तपशील मागवला आहे.

इतर बातम्या

लेनोवो टॅब K10 टॅब्लेट भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

ठरलं ! JioPhone Next ‘या’ दिवशी भारतात दाखल होणार, जाणून घ्या संभाव्य किंमत, तपशील आणि वैशिष्ट्ये

6000mAh बॅटरीसह येतात ‘हे’ 4 फोन, ज्याची सुरवातीची किंमत आहे 7,299 रुपये

(What exactly will change for Facebook users after the name change? know what Zuckerberg said)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI